Wednesday, April 29, 2026
Homeआरोग्यवार्ड क्र ३ सुविधा पासुन वंचित

वार्ड क्र ३ सुविधा पासुन वंचित

रावेर तालुक्यातील पाल येथील वार्ड क्र ३ सुविधा पासुन वंचित

रावेर (पाल) खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पुनमचंद जाधव  – या गावातील वार्ड क्रमांक ३ मध्ये 2ते 3 वर्षा पासुन रस्ता नाही . गटारी सफाई नाही अशी परिस्थिती आहे .वार्डातील मधील नागरिकांन घरकुल योजनांचा लाभ मिळाला नाही येथील रहिवासीच्या आरोग्यची काळजी घेतली जात नाही.प पूज्य लक्ष्मण चैतन्य बापूजी याच्या जन्म स्थल पासून ते ग्राम पंचायत उपसरपंच याच्या घरापर्यंत घाणीचे साम्राज्य पसरले आहेत .


तर वारंवार तक्रारी देऊन सुद्धा येथील साफसफाई केली जात नाही .तर यावर येथील रहिवासी असलेल्या नागरिकाने काय करावे येथिल लोकांचे घरातील सांडपाणी काढण्यासाठी ग्राम पंचायत पंचायत समितीच्या काहि योजना सुरू करण्यात आले . तर त्या शोष खडुया साठी काही गावातील लोग विनाकारण विरोध दर्शवत असुन ग्राम पंचायत काहीही दखल न घेता खोदलेले खड्डे परत परत बुजवण्याचे काम करत आहे .म्हणजे यात काही शंकाच नाही कि ग्राम पंचायत या वार्ड क्रमांक 3मधे कोणतेच काम न करण्याचे ठरवले आहे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .एकतर येथिल उकिरडे उचलावे नाहीतर लवकरात लवकर हा रस्ता मोकळा करून येथील रहीवासी यांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे .
निवेदनाच्या प्रती कार्यकारी अधिकारी दंडाधिकारी साहेब फैजपुर , महसूल अधिकारी व तहसिलदार साहेब रावेर , जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव नाशिक आयुक्त कार्यालय यांना पाठविण्यात आल्या आहेत .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या