Friday, May 1, 2026
Homeजळगावबोरघाटात भीषण अपघात; क्रुझर झाडाला धडकून उलटली, एकाचा मृत्यू तर ११ जण...

बोरघाटात भीषण अपघात; क्रुझर झाडाला धडकून उलटली, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

बोरघाटात भीषण अपघात; क्रुझर झाडाला धडकून उलटली, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

भुसावळ तालुक्यातील पाल-खिरोदा दरम्यान असलेल्या बोरघाटात शनिवार, 11 ऑक्टोबर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी क्लुझर (क्र. MH19 CF 3920) वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अंजनसोंडे येथील एका 55 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, 11 प्रवासी जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथील काही नागरिक पाल येथे आयोजित करण्यात आलेल्या नियोजित शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जात होते. त्यांची याक्लुझर गाडी (क्र. MH19 CF 3920) बोरघाटातून प्रवास करत असताना, घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव क्लुझर रस्त्याच्या कडेला घसरले आणि एका झाडाला जोरदार धडक देऊन तेथेच उलटले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, अंजनसोंडे येथील ५५ वर्षीय विजय राणे यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. गाडीतील इतर ११ प्रवासी जखमी झाले.

अपघात होताच मार्गावरून जाणाऱ्या अन्य नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीतील जखमींना बाहेर काढले. जखमींना त्वरित पाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, या भीषण अपघागास नेमके कोणते कारण जबाबदार आहे, यासंबंधी पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या