Saturday, March 14, 2026
Homeजळगावके नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात मिळवला राष्ट्रीय सन्मान

के नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात मिळवला राष्ट्रीय सन्मान

के नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात मिळवला राष्ट्रीय सन्मान

भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम यांचे मार्फत एनसीयूआय नवी दिल्ली येथे शाळा व महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय संशोधन व नवीन संकल्पना उपक्रम आयोजित केलेला होता . या अंतर्गत विजन फॉर स्पेस मिशन इन्स्पायरिंग द नेक्स्ट जनरेशन ऑफ स्पेस सायंटिस्ट हा तीन दिवसीय पेपर प्रेझेंटेशन व संशोधन नव उपक्रम राबविण्यात आला.

यामध्ये के नारखेडे विद्यालय भुसावळ येथील व इयत्ता दहावीचा विद्यार्थी पुष्कर विजय जावळे याच्या Tech Integrated Disaster Management system या उपक्रमाची पुढील संशोधनासाठी व मार्गदर्शनासाठी निवड करण्यात आलेली आहे. यावेळी इस्त्रोचे प्रकल्प संचालक निगार शाजी, डॉ. पी. वीरमुथुवेल, राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, तसेच प्रा. (डॉ.) एस. एस. अगरवाल, KIIT ग्रुप ऑफ कॉलेजेस, गुरुग्राम येथील संचालक जनरल आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ, ए.पी.जे.एम.जे. शेख दावूद, डायरेक्टर एआय अँड डिजिटल सोल्युशन्स, क्रिप्टॉस इन्फो सिस्टीम्स, आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे उपस्थित होते. प्रसंगी १०५ संघांतील १८३ महाविद्यालयीन विद्यार्थी आणि २६७ शाळा संघांचे सादरीकरण झाले. या विद्यार्थ्याने संपादित केलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल तसेच त्याला उत्तम मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक नितीन जनार्दन पाटील यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष किशोर नारखेडे, शालेय समिती चेअरमन श्रीनिवास नारखेडे, संस्था सदस्य भाग्येश नारखेडे, संस्थेचे सेक्रेटरी पी. व्ही. पाटील, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, प्रभारी मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, सुनील पाठक, संगणक विभाग प्रमुख बी. ए. पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या