Sunday, August 23, 2026
Homeगुन्हाशेतातील बोअरिंगमधून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिक मोटरची चोरी; गुन्हा दाखल

शेतातील बोअरिंगमधून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिक मोटरची चोरी; गुन्हा दाखल

शेतातील बोअरिंगमधून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिक मोटरची चोरी; गुन्हा दाखल

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी -;सावखेडा शिवारात असलेल्या एका शेतातील बोअरिंगमधून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ९८ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची इलेक्ट्रिक पाण्याची मोटर आणि केबल वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घराची खिडकी तोडून हे नुकसान करण्यात आले असून, याप्रकरणी मंगळवारी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अरविंद बकंटलाल लाठी (वय ७७, रा. प्रभात कॉलनी) यांनी या चोरीबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, गिरणा पंपिंग रोडच्या उजव्या बाजूला शेत शिवारात शेतात ही चोरी झाली. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेपासून ते २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.अज्ञात चोरट्याने शेतातील बोअरिंगमध्ये असलेली इलेक्ट्रिक पाण्याची मोटर आणि तिच्यासोबतची केबल वायर चोरून नेली. चोरी करताना चोरट्याने घराची बाहेरील खिडकी फोडून नुकसान केले. लबाडीच्या इराद्याने आणि फिर्यादीच्या संमतीशिवाय अज्ञात चोरट्याने ही मौल्यवान मालमत्ता चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत १ लाख ९८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.फिर्यादी अरविंद लाठी यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये २१ ऑक्टोबर रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या