अल्पवयीन मुलगा अल्पवयीन आदिवासी मुलगी पलायन प्रकरणात पोलीस पाटलांने निभावली न्यायाधीशाची भूमिका.

३० ते ४० हजार रुपये फी वसूल
यावल दि.२४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यात ग्रामीण भागात एका अल्पवयीन मुलाने एक आदिवासी अल्पवयीस मुलीस पळून नेले होते हे प्रकरण यावल पोलीस स्टेशन पर्यंत आले परंतु पोलिसांना साक्षीदार बनवून पोलीस पाटलाने या प्रकरणात तीस ते चाळीस हजार रुपये फी घेऊन प्रकरणाचा निकाल एका दिवसात दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मागील आठवड्यात अल्पवयीन मुलगा आणि आदिवासी अल्पवयीन मुलगी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीस पाटलाने त्यांची पद्धतशीरपणे समजूत घालून गुन्हा दाखल होऊ शकतो,कोर्ट कचेरीत पाच ते दहा वर्षे लागू शकतात, अल्पवयीन असल्याने तूर्त लग्न करता येणार नाही,वय पूर्ण झाल्यावर तुम्ही निर्णय घेऊ शकता अशाप्रकारे समजून घालून त्या पोलीस पाटलाने न्यायाधीशाची भूमिका निभावून एका दिवसात यावल पोलिसांच्या साक्षीने 30 अधिक 15 असे एकूण 30 ते 40 हजार रुपये फी अनुक्रमे मुलगा आणि मुलीच्या आई-वडिलांकडून घेऊन प्रकरणाचा निकाल एका दिवसात दिल्याने तालुक्यात समाजात आदिवासी बांध

