Friday, May 1, 2026
Homeजळगावआपल्यामुळे गावाचे नाव उज्वल करण्याइतका ब्रह्मानंद दुसरा कोणताच नाही - महामंडलेश्वर जनार्दन...

आपल्यामुळे गावाचे नाव उज्वल करण्याइतका ब्रह्मानंद दुसरा कोणताच नाही – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

आपल्यामुळे गावाचे नाव उज्वल करण्याइतका ब्रह्मानंद दुसरा कोणताच नाही – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
मानवी आयुष्य अत्यंत अनमोल असून महत्तम प्रयत्नांनी मिळवलेले उज्वल यशामुळे आई- वडील, समाज व गावाला लाभलेली प्रसिद्धी हाच आयुष्यातील सर्वोच्च आनंद असून गावचे प्रमोद प्रभाकर पाटील यांचे चि. कौशल याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून ठाणे येथे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती होणे हा परिवाराचा, समाजाचा यासोबतच गावाचाही फार मोठा सन्मान असल्याचे गौरवोद्गार सतपंथरत्न महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले. ते पिंपरुड येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित चिरंजीव कौशल सहित गावातील तरुणांनी मिळवलेल्या गौरव पूर्ण कामगिरी केल्याबद्दल यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर ह भ प श्री नरेंद्रदादा नारखेडे अधिसभा सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.विद्यापीठ, जळगाव,फौजी सुपडू झाल्टे पंकज कोळी ,वडील प्रमोद पाटील, आई संगीता पाटील, लीलाधर चौधरी हे होते. श्रीराम मंदिर संस्थांच्या आवारात पिंपरुड गावाच्या ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते,

 


मान्यवरांच्या हस्ते प्रथम द्वीपज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.प्रथमतः महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते चि. कौशल उपमुख्य कार्यकारी अधिकारी याचा सत्कार करून आशीर्वाद दिले, नरेंद्र नारखेडे यांनी सुद्धा सत्कार केला तसेच गावातील दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशिय संस्था यांच्या वतीने राहुल कोल्हे, श्रीराम मंदिर संस्थान अध्यक्ष शैलेश चौधरी, विविध कार्यकारी सो चेअरमन कमलाकर जंगले,ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर चौधरी, संजय तायडे ग्रामसेवक बाळू वायकोळे, नवदुर्गा दूध डेअरी चेअरमन लीलाधर चौधरी, मनुदेवी नवरात्र समिती अध्यक्ष ललित पाटील, बाल गणेश मंडळ रितेश कोल्हे. पोलिस पाटील हरीश चौधरी, तसेच गावातील नागरिकांनी सत्कार केला.तसेच डॉ. सुमित पाटील यांनी सुद्धा पी.एच डी व फेलो मेंबर अवॉर्ड मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला, गावातील अभिमानाचा क्षण म्हणजे तन्मय चौधरी यांनी पायलट चे शिक्षण पूर्ण केले,महाराजांनी सुद्धा आशीर्वाद रुपी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, आजच्या युवकांनी मोबाईलचा वापर कमी करावा व पुस्तकी ज्ञान जास्त घ्यावे व्यसनाच्या आहारी जाऊ नका,परिश्रम केल्याने यश मिळते कोणत्याही क्षेत्रात मोठे व्हायचे असेल तर परिश्रम करा तरच तुम्हाला यश शक्य आहे. नरेंद्र नारखेडे यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले, कौशल पाटील यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून युवकांना मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ सुमित पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृष्णा पाटील, नितीन जंगले, वासू पाटील, तुषार कोळी, मिलिंद पाटील अमित पाटील यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या