Friday, May 1, 2026
Homeजळगावअमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात 1000 पदार्थांचा अन्नकूट उत्सव : असंख्य भाविकांनी घेतले दर्शन...

अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात 1000 पदार्थांचा अन्नकूट उत्सव : असंख्य भाविकांनी घेतले दर्शन व महाप्रसाद

अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात 1000 पदार्थांचा अन्नकूट उत्सव : असंख्य भाविकांनी घेतले दर्शन व महाप्रसाद

फैजपूर : खान्देश लाइव्ह प्रतिनिधी

नववर्षाच्या प्रारंभी अमेरिकेतील शिकागो येथे स्थित पॅलेटाईन स्वामिनारायण मंदिरात भव्य दिपोत्सव व 1000 पदार्थांचा अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला.
वडतालधाम, पॅलेटाईन शिकागो येथे वर्षभर होणारे सर्व उत्सव गुरु स.गु.शा. श्री धर्मप्रसाददासजी यांच्या आशीर्वादाने व स.गु.शा. श्री भक्तिप्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्री धर्मप्रकाशदास, शास्त्री मुक्तप्रकाशदास तसेच संपूर्ण सत्संग समाजाच्या सहभागाने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे केले जातात.
लहान मुलांनी व मुलींनी सनातन धर्माचे संस्कार विसरू नयेत म्हणून दर रविवारी संस्कार केंद्र चालवले जाते.
प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही वाघबारसपासून नववर्षापर्यंतचे सर्व उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरे करण्यात आले. दररोज मोठ्या संख्येने भक्तांच्या उपस्थितीत गौपूजन, कालीचौदस दिवशी हनुमान पूजन, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन व 1000 पेक्षा अधिक पदार्थांचा भव्य अन्नकूटोत्सव साजरा करण्यात आला.
अन्नकूटातील सर्व पदार्थ अत्यंत पवित्रतेने सत्संगी बहिणींकडून मंदिरातच तयार केले गेले. तसेच दर रविवारीचा महाप्रसादही ह्या सत्संगी बहिणी स्वतः तयार करतात.

 


चार वेदांच्या मंत्रोच्चाराने नववर्षाचा प्रारंभ करण्यात आला. दिवसभर हजारो भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेऊन आपले जीवन धन्य केले. प.पू.ध.धु. 1008 आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज, गुरु.स.गु.शा. श्री धर्मप्रसाददासजी तसेच मंदिराचे निर्माता स.गु.शा. श्री भक्तिप्रकाशदासजी यांनी थेट आशीर्वचन दिले.
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शास्त्री धर्मप्रकाशदास व शास्त्री मुक्तप्रकाशदास यांनी केले. या प्रसंगी मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष सुभाषभाई, स्नेहलभाई, हितेशभाई, अर्जुनभाई, विनोदभाई, धर्मभाई, केयुरभाई, सुभाषभाई (मोठे) तसेच इतर अनेक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या