भारतीय बौद्ध महासभा भुसावळ तालुका कार्यकारिणी गठित अध्यक्षपदी वासुदेव निळकंठ सुरवाडे यांची नियुक्ती !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – The Buddhist society of India तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भुसावळ तालुका शाखा गठित करण्यासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली सन्माननीय रवींद्र गुरचळ महाराष्ट्र राज्याध्यक्ष, सन्माननीय शुभांगी ताई डोंगरे नाशिक विभाग प्रभारी यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.
सदर बैठक हि प्रमिला किशोर भालेराव जळगाव जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात झाली. चंद्रकांत यशवंत निकम जिल्हा उपाध्यक्ष, किशोर रामदास भालेराव जिल्हा कोषाध्यक्ष, संजय भीमराव गुरचळ जिल्हा संघटक, मनीष शशिकांत साबळे जिल्हा मीडिया समन्वयक हे उपस्थित होते. भुसावळ तालुका कार्यकारणी सन 2025 च्या तालुका कार्यकारणी मध्ये वासुदेव निळकंठ सुरवाडे भुसावळ तालुका अध्यक्ष, सागर चांगो सावळे तालुका उपाध्यक्ष, प्रमिला संजय गुरचळ तालुका महासचिव, किर्ती मनिष साबळे तालुका कोषाध्यक्ष, हरिचंद्र देवचंद इंगळे तालुका सहकोषाध्यक्ष, गौतम रामदास बोदडे तालुका मुख्य संघटक, अक्षय संतोषराव सुरवाडे तालुका विहार समन्वयक, अनिल सुकदेव सुरवाडे तालुका संस्कार समन्वयक याप्रमाणे जळगाव जिल्हा कमिटी अंतर्गत तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली अशी माहिती जळगाव जिल्हा मिडिया समन्वयक मनीष शशिकांत साबळे यांनी दिली.

