महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचा भव्य एकदिवसीय आंदोलनाचा निर्धार.

पोलिसांच्या न्याय्य हक्कांसाठी आझाद मैदानावर ४ नोव्हेंबरला गर्जणार पोलिस परिवार!
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२६
महाराष्ट्र पोलिसांच्या आणि सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता एकदिवसीय भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे करणार असून, “चलो मुंबई! चलो आझाद मैदान!” या घोषणांनी सध्या संपूर्ण पोलीस परिवारात उत्साहाचं वातावरण आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —
पोलिसांच्या पाल्यांना १० टक्के भरती प्रक्रियेत आरक्षण देण्यात यावे.सन २०२३ पासून प्रलंबित DG Loan तात्काळ वाटप करण्यात यावे.सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पत्नींना सर्व आजारांवर मोफत उपचाराची सुविधा मिळावी.
महाराष्ट्र पोलिसांची ड्युटी ८ तासांची करण्यात यावी.
पोलिसांच्या पाल्यांना उद्योग व व्यवसायासाठी शहीद तुकाराम ओंबाळे साहेबांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे. सन २००५ नंतर भरती झालेल्या पोलिसांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.१०,२०,३० वर्षांच्या सेवापूर्तीवरील लाभ संपूर्ण पोलिस दलातील अंमलदारांना लागू करावेत.रेल्वे पोलीस (महिला व पुरुष) यांच्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर चेंजिंग रूमची व्यवस्था करावी.
या आंदोलनासाठी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा शाखेने सर्व सक्रिय,सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण नगरे यांनी म्हटले आहे.

