Friday, May 1, 2026
Homeजळगावनगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमाचे कार्यालय निश्चित.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमाचे कार्यालय निश्चित.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमाचे कार्यालय निश्चित.

तहसीलदार: मोहनमाला नाझिरकर.

यावल        खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          दि.५
नगरपरिषद यावल सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात नामनिर्देशन दाखल करण्याचे ठिकाण व मतमोजणीचे ठिकाण निश्चित करण्यात आले असल्याची लेखी माहिती सह आयुक्त नगरपालिका शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना देण्यात आली.
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक संदर्भात नामनिर्देशन दाखल करण्याचे ठिकाण यावल नगरपरिषद कार्यालयात तसेच मतमोजणीचे ठिकाण यावल येथील सातोद रोडवरील नवीन प्रशासकीय इमारत ( तहसील कार्यालय यावल ) मध्ये केली जाणार असल्याची माहिती सह आयुक्त नगरपालिका शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यावल यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या