बेकायदा सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार यावल पो. स्टेला दाखल.

परंतु अडीच महिन्यात गुन्हा दाखल झाला नाही.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.५ तालुक्यातील सातोद येथील अशोक आनंदा महाजन वय ७२ या शेतकऱ्यांने तथा ज्येष्ठ नागरिकांने तालुक्यातील एका बेकायदा सावकारी करणाऱ्या विरुद्ध पोलीस कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात लेखी तक्रार केली होती आणि आहे परंतु गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत यावल पोलीस निरीक्षक यांनी कोणतीही कारवाई न केल्याने सावकाराविरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून कोणता लोकप्रतिनिधी आपला प्रभाव टाकत आहे किंवा यावल पोलिसात गुन्हा दाखल का होत नाही याबाबत तालुक्यात शेतकरी वर्गात,समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दि.१४ ऑगस्ट २०२५ रोजी त्या सावकाराविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की, माझा मुलगा सचिन अशोक महाजन याच्या पायाला सेफ्टीक झाले
असल्या कारणामुळे तो पुणे येथिल नायर हॉस्पीटल येथे ॲडमीट होता.त्याला औषधोपचारासाठी दवाखाना खर्चासाठी पैशांची आवश्यकता लागत होती.त्यामुळे मी एका व्यक्ती कडून तथा सावकारीचा धंदा करणाऱ्या कडून रक्कम रु.१०,००,०००/- घेतलेले होते. त्यावेळेस त्याने रक्कम व त्यावरील व्याज अशी एकुण २० लाख रु.२०,००,०००/- अर्जदार यांच्या मालकीची व वहिवाटीची गाव कोळवद येथिल शेत गट नं. चे क्षेत्र ही जमीन मिळकती सौदे पावती दि.१४-११-२०१४ रोजी एका महिलेच्या नावे केलेली होती.तसेच त्यानंतर त्यांनी मला सांगितले की,तुम्ही रक्कम द्याल तेव्हा द्या परंतु रकमेची हमीदारी म्हणुन सदरील मिळकतीचे
खरेदीखत नोंदवुन द्यावे. सदरील मिळकत ही त्याने बाजारभावाची किंमत रु.३,२०,०००/- दाखवुन खरेदीखत नोंदवुन घेतले होते. त्यानंतर काही काळाने त्याने परत माझ्याकडे रकमेची मागणी केली परंतु मला दवाखान्यामुळे मी त्याला
रक्कम देवु शकलो नाही.त्याने वारंवार तकादा लावल्यामुळे मी माझ्या मालकीचे शेत एकूण क्षेत्रातील क्षेत्र ६० आर ची खरेदी
करुन घेतली.त्यानंतर काही दिवसानंतर मी त्याला त्याची
घेतलेली रक्कम ही व्याजासह परत केलेली आहे.तरी तो मला जास्त व्याजाची मागणी करत आहे. आरोपी हा माझा मुलगा सचिन याला मोबाईल वरुन धमकी
देत असतो की,तु माझे पैसे व्याजा सकट परत कर! तु जो पर्यंत देणार नाही तो पर्यंत मी तुझे शेताची खरेदीखत परत करणार नाही.
तरी गैरअर्जदार हे आता माझ्याकडे येवुन मला चाळीस लाख रु.४०,००,०००/- दे, तेव्हाच मी जमीन तुला परत खरेदी करुन देईल असे सांगतो आहे.गैरअर्जदार
नं. ३ हा सतत शेतावर येवुन मला धमकी देतो की,मी तुला पाहुन घेईन.माझा व्याजाचा धंदा आहे, मला तुझ्या सारखे लोकांना पाहुन घेण्याची सवय आहे,माझ्याकडे तुझ्यासारखे बरेच लोकांच्या जमीनी गहाण आहे, मी पोलीस व कोर्ट कचेरी मानत नाही, पोलीस स्टेशन मध्ये आमचे काहीही होत नाही.आमचे मोठमोठ्या लोकांशी चांगले संबंध आहेत.तु आमचे काहीही करू शकत नाही.संबंधित
गैरअर्जदार हा शेतात आला असता त्याने धमकी दिली, व शिवीगाळ
करुन बोलला की,तुला मी विहरीत टाकुन देईल मला २ दिवसांच्या आत पैशांची व्यवस्था करुन नाहीतर तुमचा मुडदाच पाडीन. असे बोलून धमकाविले
आहे.त्यामुळे आम्ही खुपच घाबरलेले असुन आम्ही दहशतीचे वातावरणात जीवन जगत आहे. इत्यादी सविस्तर तक्रार यावल पोलीस स्टेशनला गेल्या अडीच महिन्यापूर्वी दिली आहे परंतु यावल पोलिसांनी नेमकी काय चौकशी कार्यवाही,कारवाई केली आणि संबंधितांचे काय जाब जवाब घेतले..? आणि संबंधितांचे जाब जबाब घेतले नसले तर या प्रकरणात एखाद्या लोकप्रतिनिधीचा प्रभाव आणि दबाव आहे का याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा असून संबंधित या प्रकरणात चांगलेच अडचणीत येणार असल्याचे तसेच या प्रकरणात संबंधितांचे भ्रमणध्वनी वरून कोण कोणाशी केव्हा काय बोलले आहे. तसेच व्हिडिओ क्लिपची खात्री आणि चौकशी झाल्यास सत्य,वस्तुस्थिती समाज आणि जनतेसमोर,शेतकऱ्यांसमोर येईल आणि इतर बेकायदा सावकारी करणारे सावकार शेतकऱ्यांची आर्थिक अडवणूक आणि पिळवणूक कशी करीत आहे याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे.

