महिला महाविद्यालयात डॉ दिपक शिरसाट लिखित पुस्तक प्रकाशन संपन्न..
जळगाव – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, महिला महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. दीपक शिरसाट यांचे भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास या पुस्तकाचे प्रकाशन अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रा. ए.पी चौधरी सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, प्राईम प्रकाशन चे प्रकाशक श्री प्रदीप पाटील, महाविद्यालयातील विविध विद्या शाखेचे विभाग प्रमुख व विभागातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते उपस्थित होते.
या पुस्तका व्दारे विद्यार्थ्यांना विज्ञानाची सखोल माहिती मिळेल आपल्या देशात विज्ञानाची प्रगती कोणत्या पद्धतीने सुरू आहे हे या पुस्तकात विस्तृतपणे मांडले आहे .

