Friday, May 1, 2026
Homeजळगावराजकीय पक्ष,पदाधिकारी हे प्रबळ भक्कम उमेदवार शोधण्यात आणि निश्चित करण्यात व्यस्त.

राजकीय पक्ष,पदाधिकारी हे प्रबळ भक्कम उमेदवार शोधण्यात आणि निश्चित करण्यात व्यस्त.

राजकीय पक्ष,पदाधिकारी हे प्रबळ भक्कम उमेदवार शोधण्यात आणि निश्चित करण्यात व्यस्त.

यावल         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                दि.९  यावल नगरपरिषद लोकनियुक्त आरक्षित महिला अध्यक्ष पदासाठी अपक्ष महिला उमेदवार जनतेसमोर निश्चित आहे, परंतु राजकीय पक्षातर्फे किंवा राजकीय पक्ष समर्थक नेमकी महिला उमेदवार कोण..? तसेच प्रत्येक प्रभागातून न.पा.सदस्य पदासाठी कोणता उमेदवार घ्यावा या शोधाशोध मध्ये राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी व्यस्त असल्याने अद्याप यावल शहरात निवडणुकीचे चित्र अस्पष्ट असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
काही प्रभागात राजकीय पक्षाचे सक्रिय पदाधिकारी कार्यकर्त हे आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील असले तरी पक्षाचे लोकप्रतिनिधी कोणाला एबी फॉर्म देणार आहेत किंवा नाही.? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. किंवा राजकीय पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे किंवा नाही याबाबत अद्याप कोणीही आपले ध्येय उद्दिष्ट जाहीर केलेले नसले तरी नागरिकांचे याकडे लक्ष लागून आहे.काही प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना फारच कमी प्रमाणात प्रतिसाद मिळणार असल्याने त्या ठिकाणी विरोधक म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून यामुळे यावल शहरातील सात ते आठ जागा सत्ताधारी पक्षाला मिळणार नसल्याने अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेकडे यावल शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून आहे.
यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षपद महिला राखीव असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा सामाजिक गणितामुळे महिला उमेदवार कोण.? याबाबत प्रत्येक प्रभागात चर्चा आहे.आज तरी अपक्ष अध्यक्ष पदासाठी असलेल्या महिला उमेदवारापुढे राजकीय पक्ष आपला प्रबळ अशी महिला उमेदवारी कोणाला देणार … किंवा उमेदवारी देताना राजकीय पक्षाचा निर्णय योग्य की अयोग्य राहणार हे आपल्याला निकालांती समजणार आहे.

.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या