Friday, May 1, 2026
Homeजळगावपालिकेच्या निवडणुकीसाठी महसूल व पोलीस यंत्रणेची तयारी पूर्ण.

पालिकेच्या निवडणुकीसाठी महसूल व पोलीस यंत्रणेची तयारी पूर्ण.

पालिकेच्या निवडणुकीसाठी महसूल व पोलीस यंत्रणेची तयारी पूर्ण.

यावल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महसूल व पोलीस यंत्रणेसह नगरपरिषदेची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांच्या माहितीसाठी विविध कक्ष निर्माण केले आहे त्या ठिकाणाहून सर्व माहिती मिळणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावल नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी यावल नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेतून केले.
यावेळी मतदान केंद्राबाबत तसेच इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीचे अर्ज भरताना आणि अर्ज स्वीकारताना कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून तसेच मतदार याद्या, नामनिर्देशन पत्र ऑनलाइन भरणे, नामनिर्देशन पत्राची छाननी, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, मतदान केंद्रांबाबत, ईव्हीएम मशीन बॅलेटचे युनिट, मतदान अधिकारी, नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचा खर्च इत्यादी महत्त्वाच्या विषयावर व अटी शर्तीबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी आपली पोलीस,होमगार्ड यंत्रणा सज्ज केली असून परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांची “शस्त्र” पोलीस स्टेशनला जमा केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या