मंत्री संजय सावकारे,आमदार जावळे, यांनी घेतल्या मुलाखती!
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – यावल नगरपरिषद लोकनियुक्त महिला अध्यक्षपदासाठी इच्छुक महिला उमेदवारांच्या मुलाखती भाजपाचे आमदार संजय सावकारे, आमदार अमोलदादा जावळे,माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू महाजन यांनी घेऊन भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे मुलाखतीच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
आज यावल येथे भारतीय जनता पार्टी तर्फे यावल नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी इच्छुक महिला उमेदवारांची मुलाखत घेण्यात आल्या यात प्रामुख्याने सौ.नीलिमा नितीन महाजन,सौ.रोहिणी उमेश फेगडे,या गेल्या एक महिन्यापासून चर्चेत असलेल्या महिला उमेदवारांसह सौ.महाजन,सौ.बारी, यांच्यासह एकूण ६ महिलांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आमदार सावकारे आमदार जावळे यांच्याकडे मुलाखती दिल्या.सदर मुलाखतीचे वृत्त भारतीय जनता पार्टी कडून अधिकृतरित्या मिळाले नसले तरी संपूर्ण यावल शहरात याबाबत चर्चा आहे.गेल्या महिना दोन महिन्यापासून सौ.नीलमाताई नितीन महाजन,सौ रोहिणीताई फेगडे,या दोन महिलांची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती आणि आहे. यांच्यासोबत आता आणखी चार महिलांनी अध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्याने भाजपाला अध्यक्षपदासाठी महिला उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार असल्याने शहरात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
भाजपाने लेवा पाटील महिला उमेदवार ऐवजी दुसऱ्या समाजाचा विचार करून निवड केली तर अपक्ष महिला उमेदवाराच्या पथ्यावर पडणार किंवा नाही.? याकडे आता संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.भाजपाने लेवा पाटील महिला उमेदवार ऐवजी दुसऱ्या समाजाचा विचार करून निवड केली तर अपक्ष महिला उमेदवाराच्या पथ्यावर पडणार किंवा नाही.? याकडे आता संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे