Saturday, March 14, 2026
Homeजळगावप्रा. डॉ.उमेश पाटील यांची अखील भारतीय विद्यापीठ खेलो इंडीया स्पर्धात विद्यापीठ संघ...

प्रा. डॉ.उमेश पाटील यांची अखील भारतीय विद्यापीठ खेलो इंडीया स्पर्धात विद्यापीठ संघ समन्वयकपदी नियुक्ती

प्रा. डॉ.उमेश पाटील यांची अखील भारतीय विद्यापीठ खेलो इंडीया स्पर्धात विद्यापीठ संघ समन्वयकपदी नियुक्ती

जळगाव/          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        – येत्या 24 नोव्हेबर ते 5 डिसेंबर भरतपुर,जयपुर राजस्थान येथे अखिल भारतीय खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा होणार आहे. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुस्ती, बॉक्सिंग व अॅथलेटिक्सचे संघ सहभागी होतील. एकूण पाच खेळाडू दोन संघ प्रशिक्षकांचा हा चमू असेल. या सर्व संघांचा समन्वयक म्हणून मुख्य रावेर येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर प्रा.उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

यापूर्वी २३ -२४ यावर्षी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुद्धा विद्यापीठाने समन्वयक व्यवस्थापक म्हणून प्रा. पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्याच जळगावच्या खेळाडूंनी प्रत्येकी एक सुवर्ण, रजत व कांस्य पदकाची कमाई केली होती. यंदाही खेळाडू विद्यापीठाची कामगिरी उंचावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रावेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमंत नाईक, प्राचार्य डॉ. अनील पाटील, प्रतीक नाईक विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस.यु. पाटील, प्रा. संदीप धापसे सर्व प्राध्यापक वृंद व क्रीडाप्रेमी यांनी निवडीचे स्वागत केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या