Friday, May 1, 2026
Homeगुन्हाएका आरोपीस अटक; दोन तलाठी यांच्यावर निलंबनाची प्रक्रिया सुरू तर कोतवाल यांच्यावर...

एका आरोपीस अटक; दोन तलाठी यांच्यावर निलंबनाची प्रक्रिया सुरू तर कोतवाल यांच्यावर गुन्हा दाखल

मुक्ताईनगरात अनुदान घोटाळा उघडकीस – बनावट शेतकऱ्यांच्या नावावर लाखोंचे अनुदान लाटले!

एका आरोपीस अटक; दोन तलाठी यांच्यावर निलंबनाची प्रक्रिया सुरू तर कोतवाल यांच्यावर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर.         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           ता. ८ नोव्हेंबर :
शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या अनुदानात मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणात बनावट शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान लाटल्याचा आरोप असून महसूल प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

या संदर्भात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याचे सांगितले. “ज्यांच्याकडे शेतीच नाही किंवा जे शेतकरी अस्तित्वातच नाहीत, अशांनी सुद्धा शासनाचे अनुदान घेतले,” असे त्यांनी नमूद केले. ही गंभीर बाब आहे .

राजुरा येथील एका शेतकऱ्याने तक्रार करून सांगितले की, बोरखेडा गावात अस्तित्वात नसलेल्या शेतजमिनी दाखवून काहींनी अतिवृष्टी नुकसानभरपाईचा लाभ घेतला. ही तक्रार आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाखल झाल्यानंतर त्यांनी महसूल प्रशासनास कारवाईच्या सूचना दिल्या.

तहसीलदार गिरीश वखारे यांच्या आदेशानुसार मुक्ताईनगर पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उचंदा येथील कोतवाल राहुल रवींद्र सोनवणे यास आज अटक करण्यात आली आहे. सोनवणे याच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे नागरिकांच्या नावावर अनुदान लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील एक आरोपींवर गुन्हा दाखल तर दोन तलाठी निलंबनच्या फेऱ्यात अडकले आहेः
महेंद्र राजेंद्र वंजारी – तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, बोरखेडा व के. आर. ठाकूर – तत्कालीन तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, उचंदे यांना निलंबित करण्यात आले आहे .
तर राहुल रवींद्र धनगर -कोतवाल -उचंदे अटक करण्यात आली आहे .
या घटनेने मुक्ताई नगर परिसरात खळबळ उडाली आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या