नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची आणि राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची
माजी आमदार रमेशदादा चौधरी.

महाविकास आघाडी तथा उभाठा तर्फे सौ.छायाताई अतुल पाटील यांची उमेदवारी जाहीर.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१३ यावल नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची आणि राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची असल्याची जाणीव करून देत महाविकास आघाडी तथा शिवसेना ( उभाठा ) तर्फे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पत्नी सौ.छायाताई अतुल पाटील यांची उमेदवारी यावल नगरपरिषद महिला राखीव अध्यक्षपदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केली.
ते पुढे म्हणाले की गेल्या आठ-दहा दिवसापासून महाविकास आघाडी नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांची आपापसात चर्चा सुरू होती त्या चर्चेनुसार अंतिम निर्णय घेऊन महाविकास आघाडी तथा शिवसेना उभाठा तर्फे यावल नगरपरिषद आरक्षित अध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार सौ छायाताई अतुल पाटील यांची उमेदवारी मशाल चिन्हावर जाहीर करण्याचे निश्चित केले.याच सोबत यावल नगरपरिषद प्रभागा – प्रभागात काँग्रेस पंजा या निशाणीवर,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, आणि मशाल चिन्हावर उमेदवार देणार असल्याची माहिती माजी आमदार रमेशदादा चौधरी यांनी दिली.
भाजपाचे राजकारण घाणेरडे आणि जातीयवादी – –
भाजपाचे राजकारण घाणेरडे आणि जातीयवादी असल्याचे सांगून नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या निवडणुक रिंगणात आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या विरोधात भाजप काहींना पैशांचे आर्थिक प्रलोभन देऊन उभे करतील त्याकडे महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आणि मतदारांना याबाबत जागृत करावे लागणार असल्याचे भाजपा सत्ताधारी पक्षाकडे पैसा दौलत अधिकार असल्याने ते साम-दाम-दंड-भेद यातून सर्वतोपरी दडपण दडपशाही आणण्याचा प्रयत्न करतील असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीरखान शेठ यांनी सांगितले.
भाजपाला मात देणार —- नगरपरिषद निवडणुकीत प्रत्येक प्रभागात नगरसेवक सदस्य पदासाठी महाविकास आघाडीचे प्रत्येक प्रभागात एकूण २३ इच्छुक प्रबळ उमेदवार देऊन त्यांच्या मार्फत भाजपाला नियोजनबद्ध रीतीने ‘ मात’ देणार तसेच शनिवार दि.१५ रोजी सौ.छायाताई पाटील यांचा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरायला जाताना आपण सर्वांनी शक्ती प्रदर्शन दाखवून भाजपाची ५६ इंचाची छाती ‘ दडपणार’ असल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह पत्रकारांना सांगितले.
पत्रकार परिषदेत माजी आमदार रमेशदादा चौधरी, हाजी शब्बीर खान सेठ,अतुल पाटील शिवसेनेचे पदाधिकारी गोपाल चौधरी,शरद कोळी,प्रा. मुकेश येवले, जगदीश कवडीवाले,कडू पाटील,संतोष खर्चे उर्फ धोबी,सारंग बेहेडे,पप्पू जोशी, योगेश पाटील,दीपक बेहेडे,तसेच अभिमन्यू चौधरी,सागर चौधरी,
डॉ.युवराज चौधरी,नरेंद्र शिंदे,गोलू माळी,हुसेन तडवी,काँग्रेस शहर अध्यक्ष हकीम शेख, माजी नगरसेवक आताउल्ला खान,समीर मोमिन,समीर नालवाले,करीम मण्यार,मनोहर सोनवणे,जाकीर मेंबर,सैय्यद युनुस,शेख अस्लम, उमर कच्ची, मजहर खान,शफी शेख इत्यादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

