Friday, May 1, 2026
Homeजळगावउद्या महाविकास आघाडी अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार..

उद्या महाविकास आघाडी अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार..

यावल नगरपरिषद निवडणुकीसाठी ७ नामनिर्देशन पत्र दाखल.

उद्या महाविकास आघाडी अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार..

यावल              खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      दि.१४
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत दि.१३ रोजी १ आणि दि.१४ रोजी ६ असे एकूण ७ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझीकर यांनी दिली.
दि.१३ रोजी प्रभाग क्रमांक ६ ब मधून डांगपुरा भागातील कच्ची करीम कासम वय ७२

तर शुक्रवार दि.१४ रोजी शाहीन बी शेख रशिद शेख रशिद
६ अ वय ४८ रा. मन्यारवाडा, तर प्रभाग क्र. ५ ब मधून खान रुस्कारजबीन जामीर वय ३२ रा. बाबूजीपुरा., प्रभाग ५ अ मधून
पिंजारी एजाज कादर कादर वय ५४ रा. पिंजारवाडा.प्रभाग क्र.११ ब मधून चौधरी मधुकर मुरलीधर वय ५२ रा.महाजनगल्ली, प्रभाग २ ब मधून खान अंजुम बी कादीर वय. ४० रा. काजीपुरा.प्रभाग ४ अ मधून
लोखंडे समिता अरुण वय ४३ रा. विरारनगर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.

प्रभाग क्रमांक ६ अ मधून १ व ब मधून १, प्रभाग क्र. ५ अ व ब मधून २ , प्रभाग क्र.११ ब मधून १, प्रभाग क्र.२ ब मधून १,प्रभाग क्र. ४ अ मधून १ या प्रकारे एकूण १० प्रभागापैकी ५ प्रभागातून फक्त ७ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

आज शनिवार दि.१५ रोजी महाविकास आघाडी कडून लोकनियुक्त महिला अध्यक्ष पदासाठी शिवसेना उभाठाच्या अधिकृत उमेदवार सौ.छायाताई अतुल पाटील यांचे नामनिर्देशन पत्र दाखल होणार आहे.यासाठी महाविकास आघाडी कडून शक्ती प्रदर्शनाची जय्यत तयारी आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या