नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी भाजपाचा निर्णय होत नसल्याने मतदारांत आणि समाजात उत्सुकता.

समाजात मतभेद निर्माण होण्याची दाट शक्यता.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१४ यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त अध्यक्षपद महिला राखीव असल्याने तसेच महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी निश्चित झाली परंतु भारतीय जनता पार्टी तर्फे कोणत्या महिलेला उमेदवारी दिली जाईल याबाबत संपूर्ण यावल शहरात पदाधिकारी,कार्यकर्ते, मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण तर झाली आहेच परंतु भारतीय जनता पार्टीतर्फे महिला अध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित करताना जनतेशी,मतदारांशी, नागरिकांच्या,पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संपर्कात सर्वात जास्त कोण आहे,कोणाचा संपर्क जास्त होता आणि आहे याचा विचार न करता उमेदवारी दिली गेल्यास यावल शहरात मतदारांमध्ये आणि समाजात मतभेद निर्माण होऊ शकतात याची दखल भारतीय जनता पार्टीने तात्काळ घेऊन उमेदवारी जाहीर करावी अशी चर्चा होत आहे.

