Friday, May 1, 2026
Homeजळगावभा.रा.काँग्रेस,शिवसेना ( उभाठा ) यांच्यातर्फे अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल.

भा.रा.काँग्रेस,शिवसेना ( उभाठा ) यांच्यातर्फे अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल.

भा.रा.काँग्रेस,शिवसेना ( उभाठा ) यांच्यातर्फे अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल.

सुशिक्षित लाडक्या बहिणींची उमेदवारांच्या मागे मोठी गर्दी.

यावल           खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि.१५
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत दि.१५ रोजी महाविकास आघाडी तर्फे अध्यक्ष पदासाठी सौ.छाया अतुल पाटील यांनी शिवसेना ( उबाठा ) कडून मशाल या चिन्हावर अधिकृतरित्या उमेदवारी दाखल केली यासोबत न.प.सदस्य पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,आणि शिवसेना ( उभाठा ), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) आणि अपक्ष अशा एकूण अध्यक्षपदासह २३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे दाखल केले. यावेळी यावल नगरपरिषद कार्यालयाच्या 100 मीटर अंतराच्या बाहेर मतदार, नागरिकांच्या उपस्थितीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी यावल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी शिवसेना ( उभाठा ) तर्फे अध्यक्ष पदासाठी सौ.छाया अतुल पाटील यांचे उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापासून निघालेली शक्ती प्रदर्शनाची रॅली प्रत्यक्ष यावल शहरातील मतदारांनी, नागरिकांनी बघितली असता त्यात हजारो सुशिक्षित लाडक्या बहिणीं आपल्या आवडत्या उमेदवारांच्या पाठीमागे सहभागी झालेल्या दिसून आल्या.
महायुती आणि अपक्ष उमेदवारांची उमेदवारी दाखल करताना उमेदवारांच्या मागे निघालेल्या रॅलीत महिलांची,नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती दिसून आल्याने महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अनेक सुशिक्षित महिलांची दिशाभूल करीत अनुदान बंद केल्याचा रोष व्यक्त होत असल्याचे संपूर्ण यावल शहरात आणि परिसरात चर्चा आहे.

भारतीय जनता पार्टी तर्फे नगरपरिषद महिला अध्यक्षपदासाठी अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यासाठी विलंब होत असल्याने मतदारांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून आज तरी यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात महाविकास आघाडीचा प्रभाव असल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्र.८ ब मधून शिवसेना ( उभाठा) तर्फे चौधरी सागरकुमार सुनील यांची उमेदवारी दाखल झाल्याने प्रभागातून सर्व स्तरातून त्यांच्या सामाजिक,व्यावसायिक कामाचे मूल्यमापन होऊन त्यांना मोठा प्रतिसाद मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या