मुक्ताईनगर तालुक्यातील ढोरमाळ येथे बाल आनंद मेळावा व बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी..!
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा ढोरमाळ तालुका मुक्ताईनगर येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गोरखनाथ पंडित सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात बाल विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य व्यंजन त्यांनी घरून बनवून आणून उपस्थित मान्यवरांचे मन जिंकून घेतले. तसेच
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शौर्य सुकलाल सोनवणे या भिल्ल समाजाच्या बाल विद्यार्थ्यांने हुबेहूब बिरसा मुंडा यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी ढोरमाळ येथील सरपंच गणेश धुंदे, माजी अध्यक्ष मुकेश जंजाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील तसेच सर्व ग्रामस्थ व शिक्षक वृंद उपस्थित राहून बाल आनंद मेळाव्याचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे
घोडसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय दुट्टे यांनी भेट देऊन विद्यार्थी,शिक्षक व पालक यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. सदर मेळाव्याच्या आयोजन व यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील उपशिक्षक हनुमंत यादव यांनी प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाचे सांगता ही अकरा वाजता करण्यात आली.

