Saturday, December 13, 2025
Homeजळगावलोकनियुक्त महिला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना उभाठा यांच्यात अत्यंत चुरशीची लढत...

लोकनियुक्त महिला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना उभाठा यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार…

लोकनियुक्त महिला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना उभाठा यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार…

अध्यक्षपदासाठी ६ नामनिर्देशक पत्र दाखल.

अध्यक्षासह २४ जागांसाठी १३७ नामनिर्देशन पत्र दाखल.

यावल         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि.१७
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त अध्यक्ष पदाच्या जागेसह २४ जागांसाठी १३७ नामनिर्देशन पत्र दाखल झाले.

यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षपद महिला राखीव असल्याने एकूण ६ महिलांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले असले तरी यात प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अनुक्रमे छाया अतुल पाटील आणि रोहिणी उमाकांत फेगडे यांच्यात अत्यंत चूरशिची लढाई होणार आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी छाया अतुल पाटील यांची उमेदवारी आधीपासूनच निश्चित झाली होती त्यात त्यांना महाविकास आघाडीकडून प्राधान्य मिळाल्याने शिवसेना उभाठा तर्फे मशाल या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. यामुळे राजकीय सामाजिक वातावरण चांगलेच तापले आणि भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षाच्या महिला उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी म्हणजे दि.१७ नोव्हेंबर रोजी निश्चित केल्याने उशिरा का होईना पक्षात उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षपदासाठी आणि नगरपरिषद सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी एकूण ५३ उमेदवारांनी आपले नाम निर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे दाखल केले.

यावल नगरपरिषद लोकनियुक्त महिला अध्यक्ष पदासाठी एकूण ६ नामनिर्देशक पत्र दाखल झाले आहेत.
तर यावल नगरपरिषद एकूण ११ प्रभागातून २३ सदस्य पदासाठी अध्यक्षपदाचे नामनिर्देशन पत्रासह एकूण १३७ नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहेत. यातून छाननीच्या प्रक्रियेत कोणाकोणाचे अर्ज बाद होतात आणि माघारीच्या अंतिम तारखेपर्यंत कोण माघार घेणार याकडे आता संपूर्ण यावल शहरासह निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे लक्ष लागून आहे.

लोकनियुक्त महिला अध्यक्षपदासाठी छाया अतुल पाटील उभाठा तर्फे,अफरिन अंजुम शेख अलीम,चैताली प्रशांत पाटील, स्वाती मनोहर पाटील शिवसेना शिंदे गट , रोहिणी उमाकांत फेगडे भारतीय जनता पार्टी,सुलेमानी
शबानावी आरीफखा या सहा महिलांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या