Thursday, April 30, 2026
Homeआरोग्यग्रामीण रुग्णालयात दीड वर्षापासून एक्स-रे मशीन ना दुरुस्त.

ग्रामीण रुग्णालयात दीड वर्षापासून एक्स-रे मशीन ना दुरुस्त.

ग्रामीण रुग्णालयात दीड वर्षापासून एक्स-रे मशीन ना दुरुस्त.

‘क्ष’ किरण वैद्यकीय अधिकाऱ्याला मात्र नियमित वेतन.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                      दि.३०
येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून एक्स-रे मशीन बंद आहे परंतु क्ष किरण वैद्यकीय अधिकाऱ्याला दरमहा नियमित वेतन मिळते परंतु रुग्णांना सेवा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे मशीन बंद असल्याने एक्सरे मशीन हाताळणारे क्ष किरण वैद्यकीय अधिकारी हे कार्यालयीन वेळेत अनियमितपणे उपस्थित राहत असले तरी त्यांना महिन्याला नियमित वेतन मिळते यात शासनाचे गेल्या दीड वर्षात वेतनाच्या माध्यमातून लाखो रुपये पाण्यात जाऊन रुग्णांना मात्र वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे याकडे राजकीय, सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे मशीन तात्काळ दुरुस्त करून रुग्णांना सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रवीण डांबरे यांनी केली आहे.

ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे मशीन बंद असल्याने क्ष किरण वैद्यकीय अधिकारी यांना यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांना पात्र असे शासकीय कामकाज नसल्याने तसेच ते कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतात किंवा नाही याबाबत रुग्णांमध्ये संशय व्यक्त केला जात असून जिल्ह्यात ज्या ठिकाणी एक्स-रे मशीन आहे त्या ठिकाणी त्याची नियुक्ती केल्यास रुग्णांना लाभ आणि सेवा मिळेल अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या