Friday, May 1, 2026
Homeजळगावनाहरकत दाखला असताना उमेदवारी अर्जावर व्यक्ती द्वेषशातून हरकत : माजी नगराध्यक्ष अतुल...

नाहरकत दाखला असताना उमेदवारी अर्जावर व्यक्ती द्वेषशातून हरकत : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील.

नाहरकत दाखला असताना उमेदवारी अर्जावर व्यक्ती द्वेषशातून हरकत : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील.

शिवसेना स्टाईल शांततेने बाजू मांडल्याने अर्ज वैध.

यावल          खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               दि.१८
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत आज छाननीचा दिवस होता यात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या सदस्य पदाच्या नामनिर्देशन पत्रावर आणि महिला अध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी छाया अतुल पाटील, आणि माजी नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी यांच्या नामनिर्देशन दाखल नामनिर्देशनपत्रावर विरोधकांनी हरकत नोंदविल्याने विरोधकांनी या हरकती व्यक्ती द्वेषशातून दाखल केल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.

नामनिर्देशन पत्र दाखल करताना
बे – बाकी दाखला / नाहरकत दाखला जोडलेला असताना विरोधकांनी व्यक्ती द्वेषशातून हरकत घेतली आणि नामनिर्देशक पत्र अवैध ठरविण्यासाठी वेगवेगळे २ कायदे तज्ञ हजर केले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी वकील न लावता स्वतः आपली बाजू शिवसेना स्टाईल लोकशाही पद्धतीने शांततेत मांडून विरोधकांची हरकत चुकीची असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली.यासोबत शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष शरद सुरेखा कोळी यांच्याबाबत सुद्धा जी हरकत घेतली होती ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळून त्यांचा अर्ज वैध

 

ठेवला.हरकतीच्या मुद्द्यावर सुमारे ३ तास दोघे बाजूचे म्हणणे ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास निकाल देऊन हरकती घेतलेले नामनिर्देशक पत्र वैध ठरविल्याचा निकाल दिला. नगरपालिका कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी वाढता बंदोबस्त होता.
विरोधकांनी जी हरकत घेतली त्यात कायदेशीर कोणताही दम पुरावा न होता परंतु व्यक्ती द्वेशातून हरकत घेऊन नगरपालिका कामकाजाविषयी अनुभव आणि ज्ञान असलेले व्यक्तिमत्व नगरपालिकेत नको आणि आपल्याला नगरपालिकेत यावल शहरात कामकाज करताना रान / कार्यक्षेत्र मोकळे होण्यासाठी विरोधकांनी बिन बुडाची हरकत घेतली हा आमचा विजयाचा कौल असल्याची प्रतिक्रिया सुद्धा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या