पोस्टरवर फोटो न घेतल्याने राजकीय पक्षाच्या
कार्यालयात मोठा दांगडो.

यावल शहरात चर्चेला उधाण
यावल : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्ष आणि अपक्षांचा प्रचार मोठ्या जोमाने सुरू आहे.एका बाजूला प्रचार तर दुसऱ्या बाजूला नगरपालिका कार्यक्षेत्राच्या बाहेर विकास कामांचा शुभारंभ सुद्धा धुमधडाक्याने सुरू असला तरी प्रसिद्धी फक्त ऑनलाइन प्रसिद्धी माध्यमातून होत आहे परंतु एका सार्वजनिक कार्यक्रमाची प्रसिद्धी करताना एका जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याचा फोटो पोस्टरवर न घेतल्यामुळे त्या पदाधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ नेत्याच्या समक्ष कार्यालयातच सिनेमा स्टाईल मोठा दांगडो केल्याने तसेच उपस्थित जबाबदार त्या लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सर्व भ्रमणध्वनी बंद करण्याचे आव्हान करून शांत बसायला सांगितले (भ्रमणध्वनी बंद करण्याचे कारण म्हणजे प्रसिद्धी माध्यमांपर्यंत व्हिडिओ फोटो जायला नको म्हणून ) यामुळे
यावल शहरात सर्व स्तरात चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याला समजले की अनेक ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला परंतु आपल्या कार्यक्षेत्रात जो शुभारंभ करण्यात आला त्या ठिकाणच्या पोस्टर मध्ये आणि
कार्यालयात लावलेल्या फलकावरील फोटोवरून वाद
चिघळला आणि त्या एका लोकप्रतिनिधींने आपला संताप आपल्या पक्षातीलच पदाधिकाऱ्यांसमोर नेत्यासमोर व्यक्त केला.पक्षात नवीन जेष्ठ माजी जि.प.सदस्याला प्राधान्य आणि ज्यांनी पक्षासाठी रक्ताचे पाणी करून फुलाचे पीक घेतले अशा शब्दात त्यांनी उपस्थितनांना जाब विचारला नगरपालिका निवडणुकीमध्ये आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत याचे विपरीत परिणाम कसे उमटतील हे आता
तुम्हाला दिसून येईल अशा त्या संतप्त झालेल्या एका जिल्हास्तरावर गेलेल्या सदस्यांने
आपल्या वरिष्ठ लोकप्रतिनिधीला सांगितल्याने यावल शहरात मेन रोडवरील प्रख्यात बाजाराच्या समोर घडल्याने शहरात पक्षाच्या नियोजनाबाबत गुलाबी थंडी रंगीबेरंगी चर्चा सुरू झाली आहे.

