पुरवठा विभागातून वितरित होणाऱ्या रेशन दुकानात व्हिट्यामीन युक्त तांदळामुळे ग्राहक संभ्रमात.

आमदाराच्या सूचना गेल्या खड्ड्यात.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२४
यावल तालुक्यात पुरवठा विभागातून रेशन दुकानदारांना पुरवठा होणाऱ्या व्हिट्यामीन युक्त तांदळामुळे रेशन कार्डधारक ग्राहक संभ्रमात पडले असून ग्राहकांना तांदळाचे काही दाणे प्लास्टिक सारखे वाटत असल्याने याबाबत पुरवठा विभागाने ग्राहकांचा संभ्रम दूर करावा तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी आमदार अमोल जावळे यांनी यावल पुरवठा विभागाला अचानक प्रत्यक्ष भेट देऊन काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचना पुरवठा विभागाने कचराकुंडी टाकल्याची चर्चा आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तालुक्यात पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानदारांना जो तांदूळ पुरवठा केला जातो त्या तांदळात केंद्र सरकारच्या आदेशानुसार ग्राहकांना व्हिट्यामीन पुरवठा व्हावा म्हणून ५० किलोच्या गोणीमागे ५० ते १०० ग्रॅम विटामिन युक्त तांदूळ पुरवठा होत असल्याने आणि हा तांदूळ प्लास्टिक सारखा पाण्यात तरंगत असल्याने ग्राहकांना असे वाटते की हा तांदूळ प्लास्टिक युक्त आहे का.? या विटामिन युक्त तांदळामुळे रेशन कार्ड ग्राहक संभ्रमात पडले असून याबाबत शासनाने ग्राहकांमध्ये जनजागृती करायला पाहिजे परंतु तसे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे जनजागृती केली नसल्याने ग्राहकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे ( पुरवठा विभागाकडून दिवाळीत फक्त काही ७ / ८ दुय्यम व्यवसाय करणाऱ्यांना पाकिटात “एम टॉनिक” मिळाल्याची चर्चा असल्याने तालुक्यात प्रसिद्धी झालेली नाही )
गेल्या दोन महिन्यापूर्वी आमदार जावळे यांनी अचानक यावल येथील शासकीय गोदामाला भेट देऊन गोदामातील तांदूळ गहू इत्यादी प्रत्यक्ष बघितले व रेशन कार्डवर होणारे धान्य चांगल्या प्रतीचे वितरित करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचना यावल पुरवठा विभागाने अद्याप प न पाळता कचराकुंडी टाकल्याचे दिसून येत आहे कारण रेशन दुकानदारांना होणारा धान्य पुरवठा हा क्वालिटीचा आणि योग्य प्रमाणात वजनात मिळत नसल्याची रेशन दुकानदारांमध्ये आणि ग्राहकांमध्ये चर्चा आहे त्यामुळे आमदार अमोल जावळे यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी दिलेल्या सूचनांची पुन्हा आठवण करून द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी आहे.

