Saturday, March 14, 2026
Homeजळगावमहाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव २०२५ आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शुभम मुलांडेची निवड...

महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव २०२५ आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शुभम मुलांडेची निवड !

महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव २०२५ आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शुभम मुलांडेची निवड !

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मैदानी स्पर्धा (पुरुष संघात) श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचा खेळाडू शुभम हरिश्चंद्र मुलांडे (प्रथम वर्ष विज्ञान) याची निवड झाली. “27वी महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव 2025” आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा या दिनांक 4 ते 8डिसेंबर 2025 रोजी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे संपन्न होत आहे.

 

या क्रीडा महोत्सवात खो- खो ,कबड्डी ,व्हॉलीबॉल, बास्केटबॉल,मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस, बॅडमिंटन ,बुद्धिबळ (पु.व म.)या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या सर्व क्रीडा प्रकारातील खेळाडूंचा एकत्रित सराव आपल्या क. ब . चौ.उ .म.वि. जळगाव येथे दिनांक 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 दरम्यान घेण्यात आला. नंतर 3 डिसेंबर 2025 रोजी संघ स्पर्धेच्या ठिकाणी सहभागी होण्यासाठी रवाना झाले. शुभम मुलांडे या खेळाडूची मैदानी स्पर्धेतील 1500 मीटर धावणे व 5000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारासाठी निवड झाली. त्यास प्रा. डॉ. प्रतिभा ढाके( क्रीडा संचालक )यांचे मार्गदर्शन मिळाले शुभम च्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा.एडवोकेट रोहिणी ताई खडसे- खेवलकर, उपाध्यक्ष मा.नारायण दादा चौधरी, सचिव मा.डॉ.सी एस दादा चौधरी सर्व सन्माननीय व्यवस्थापन सदस्य, मा. प्राचार्य प्रो. डॉ. एच. ए. महाजन, उप प्राचार्य डॉ. संजीव साळवे ,उपप्राचार्य डॉ.वंदना चौधरी, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी ,सर्व खेळाडू यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या