Saturday, March 14, 2026
Homeजळगावसौ.पुनम फालक यांना मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार प्रदान

सौ.पुनम फालक यांना मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार प्रदान

सौ.पुनम फालक यांना मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार प्रदान

भुसावळ खान्देश लाईव्ह प्रतिनिधी – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी व विद्यार्थी प्रिय व्यक्तीमत्व सौ.पूनम विजय फालक यांना नुकताच इचलकरंजी येथे मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज *नारी रत्न पुरस्कार* प्रदान करण्यात आला . हा पुरस्कार रवी साहेब रजपुते माजी उपनगराध्यक्ष, प्राचार्य डॉ. त्रिशला कदम अध्यक्ष, सौ अक्षरा कांबळे, अरुण रंजना कांबळे, संतोष निकम, प्रमोद अंदुरकर, स्वप्निल गोरंबेकर, तेजस्विनी राजपूत यांच्या उपस्थितीत व कोल्हापूरचे यांच्या आशीर्वादाने इचलकरंजी येथे भव्य दिव्य अशा शाहू महोत्सवा अंतर्गत वरील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.


यावेळी अरुण रंजना कांबळे संकल्पना प्रमुख यांनी सौ. पूनम विजय फालक यांच्या आजवरच्या कार्यावर प्रकाश झोत टाकला तसेच त्यांना नुकताच आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सुद्धा सर्व सभागृह समक्ष त्यांचे अभिनंदन केले. नारीरत्न पुरस्कार घेत असताना पुनम फालक यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. इचलकरंजी येथे हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासमवेत स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन कांचन जगन्नाथ नेमाडे ह्या ही उपस्थित होत्या. पुनम पालक यांनी हा पुरस्कार माझ्या स्वतःचा नसून, माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मित्र मैत्रिणी, परिवार व विद्यार्थ्यांचा आहे व त्यांना मी समर्पित करीत आहे. पुनम फालक यांनी आजतागायत आपल्या सोळा वर्षाच्या कारकीर्दित हजारो विद्यार्थी घडवली असून ते आज ऊच्च पदावर कार्यरत आहेत. हा त्यांच्या कार्य कर्तुत्वाचा सन्मान आहे.
त्यांच्या या पुरस्कार प्राप्त कर्तुत्वाचा ताप्ती पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन पालक , महेश फालक, विष्णूभाउ चौधरी ,संजय नाहाटा व सर्व

पदाधिकारी, नाहाटा काॅलेजचे प्राचार्य प्रा.बि.एच. बर्‍हाटे ,भोळे कॉलेजचे प्राचार्य डाँ.आर.पी फालक ,नगरसेवक पिंटु कोठारी,माधुरी फालक, उल्हासनगर येथील कांचन नेमाडे, जगन्नाथ नेमाडे, मनोज पाटील, दिनेश पाटील, तापी पब्लिक स्कूलच्या प्राचार्यां निना कटलर, उप प्राचार्या पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच भुसावळ व कुर्‍हे पानाचे येथील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती हो वो या सद्भावना व्यक्त केल्या आहेत ,पुनम फालक यांचे यजमान विजय फालक ,सुपुत्र जय फालक,सुपुत्री लावण्या फालक यांनी सुद्धा आपल्या परिवारात प्राप्त या मानाच्या तुऱ्यास अभिवादन केले आहे. सर्व स्थरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या