Tuesday, March 3, 2026
Homeजळगावभुसावळ येथील नाहाटा कॉलेज मध्ये कार्यरत तीन अपत्य असणाऱ्यांना बडतर्फे करा दिनेश...

भुसावळ येथील नाहाटा कॉलेज मध्ये कार्यरत तीन अपत्य असणाऱ्यांना बडतर्फे करा दिनेश भोळे यांची वरिष्ठा कडे मागणी

भुसावळ येथील नाहाटा कॉलेज मध्ये कार्यरत तीन अपत्य असणाऱ्यांना बडतर्फे करा
दिनेश भोळे यांची वरिष्ठा कडे मागणी

भुसावळ        खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे, भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, येथे प्रा. डॉ.ममताबेन सी पाटील यांना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे, भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ ता. भुसावळ जि. जळगांव यांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वीच तीन अपत्य असूनही त्यांना नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती देवून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी सेवेतून तात्काळ बडतर्फ करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत चे पत्र दिनेश भोळे यांनी शिक्षण संचालक व संबंधित विभागांना पाठविले आहे .
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की
ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या अखत्यारीत पु. ओ. नाहाटा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ ही संस्था व इतर संस्था कार्यरत आहेत. सदर ठिकाणी प्रा. डॉ. ममताबेन सी पाटील सहयोगी प्राध्यापक या दि. १६/०६/२०११ पासून सेवेत रुजू झालेल्या ( नियुक्ती ) आहेत. त्यांना सेवेत रुजू होण्यापूर्वीच १४/०८/२००४ रोजी दोन जुळी मुले व १५/०३ /२००९ रोजी एक मुल अशी तीन अपत्य आहेत. त्यानुसार २८/०३/२००५ शासन निर्णयानुसार सेवेत नियुक्तीस अपात्र झालेल्या आहेत. संदर्भ क्र. १ नुसार सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक सीडीआर- १०९३/१०७७/प्र.क्र. २३/९३/अकरा, दि. १२/१०/१९९३, यात एखादा शासकीय कर्मचारी शासन सेवेतील मुळ नेमणुकीसाठी संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदी प्रमाणे पात्र न होता वा विहीत अहर्ता प्राप्त न होता अथवा त्याची नेमणूक मिळण्यासाठी खोटी माहिती अथवा खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास त्या कर्मचाऱ्याला सेवेत ठेवण्यात येवू नये. बडतर्फ करण्यात यावे ,असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. संदर्भ क्र २ नुसार सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र. एस आरव्ही-२०००/प्र.क्र.(१७/२०००)/ बारा, दि. २८/०३/२००५, यात महाराष्ट्र नागरी सेवा ( लहान कुटूंबाचे प्रतीज्ञापन ) नियम २००५ अन्वये शासन सेवेतील गट-अ ते गट-ड मधील सर्व पंदावर सरळसेवेने करावयाच्या नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची अट लागू करण्यात आली असून लहान कुटूंब याचा अर्थ दोन मुले यांसह पती पत्नी असा आहे, याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला आहे. संदर्भ क्र ३ नुसार, परीपत्रक, महाराष्ट्र नागरी सेवा ( लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ च्या अंमलबजावणी बाबत दि. ०१/०७/२००५ यात राज्य लोकसंख्या धोरणाच्या अंतर्गत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याच्या दृष्टीने दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या उमेदवारांना शासन सेवेत नियुक्ती देण्यास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा अंमलात आले आहेत. त्या संबधिची संदर्भाधीन दि. २८ मार्च २००५ ची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २८ एप्रिल २००५ च्या राजपत्र भाग चार अ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अधिसुचनेनुसार शासन सेवेतील गट अ ते ड मधील सर्व पंदावर सरळसेवेने करावयाच्या नियुक्त्यांसाठी अधिसूचनेत विहीत केलेली “लहान कुटूंबाची” अतिरिक्त अट लागू झालेली आहे. यास्तव यापुढे शासकीय सेवेत नोकरभरती करतांना सदर नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जाहिराती मध्ये आवश्यक ती अट नमूद केली जाईल आणि सदर नियमातील प्रतिज्ञापन नमुना “अ” नुसार सर्व उमेदवारांकडून प्रतिज्ञापन घेतले जाईल याची दक्षता सर्व नियुक्ती प्राधिका-यांनी घ्यावी, असे निर्देश याद्वारे देण्यात आलेले आहेत.
परंतू, संदर्भ क्र ४ च्या, माहिती अधिकार प्राप्त माहितीनुसार सन २००५ पासून सरळ सेवा भरतीने आलेल्या सहयोगी प्राध्यापकांची यादी पत्त्या सहित उपलब्ध आहे. त्या नुसार अ.क्र. १४ ला प्रा. डॉ. ममताबेन सी पाटील यांची सेवेत रुजू दिं.१६/०६/२०११ असून त्यांची सेवा निवृत्ती दिंनाक ३१/०५/२०४२ असा असून पत्ता भिरुड कॉलनी रिंग रोड भुसावळ असा पुरावा उपलब्ध आहे. संदर्भ क्र ५ च्या प्राप्त माहिती नुसार माहितीत डॉ. ममताबेन सी पाटील यांनी स्वतः लेखी स्वरूपात लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना-अ मध्ये लिहून दिलेले आहे की “दि. १४/०८/२००४ रोजी दोन जुळी मुले व दि. १५/०३/२००९ रोजी एक मुल अशी तीन अपत्य त्यांना हयात आहेत. तसेच दि. २८/०३/२००५ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनाहर्ता / अपात्र ठरविण्यास पात्र होईन, याची मला जाणीव आहे, याबाबत स्वतः च्या सहीनीशी पुरावा उपलब्ध आहे.
सदर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे, पु ओ नाहाटा भुसावळ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेल्या प्रा. डॉ. ममताबेन सी पाटील यांना शासन सेवेत रुजू होण्यापूर्वीच त्यांना तीन अपत्य असल्याने वरील संदर्भ क्र १,२,३,४,५ नुसार त्या शासन सेवेत नियुक्तीस अपात्र असताना त्यावेळी त्यांनी नियुक्ती मिळवण्यासाठी लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र खोटे सादर करुन सदरची नियुक्ती मिळवून घेतली असावी किंवा सदर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष/सचिव/सर्व पदाधिकारी /सभासद यांनी व भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील प्राचार्य यांच्याशी संगनमत करुन संबधित व्यक्तीला चुकीच्या पध्दतीने शासन नियमांचे उल्लंघन करुन सदरची नियुक्ती देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण केल्याचे दिसते. बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती मिळवलेल्या प्रा.डॉ. ममताबेन सी पाटील यांनी दि. १६/०६/२०११ पासून लाखो रुपयांचे वेतन मिळवलेले आहे व शासनाची तसेच सर्व वरीष्ठ कार्यालयाची बनावट कागदपत्रे सादर करुन फसवणूक केलेली आहे.
तरी सदर प्रा. डॉ. ममताबेन सी पाटील,यांच्यावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे, अध्यक्ष/सचिव/सर्व पदाधिकारी/सदस्य/सभासद तसेच प्राचार्य भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ ता. भुसावळ, जि. जळगांव यांनी तात्काळ कारवाई करून वेतन वसूली व बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करावी. तसे न केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांमुळे आपणावर वैयक्तिक जबाबदारी निश्चित होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. असे दिनेश भोळे यांनी पत्रकात नमूद केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या