कुऱ्हे पानाचे येथे शिवभक्तांनी अचानक बसविला छ . शिवरायांचा पुतळा .
रितसर परवानगी घेवुन पुतळा बसेपर्यंत पुतळा तेथे राहणार .
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील बस स्थानकावर शिवभक्तांनी रविवारच्या रात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. महिलांसह शिवभक्तांनी पुतळ्याजवळ ठिया मारून विरोध करत पोलिसांना हटविण्यापासून रोखले, तर मंत्री . संजय सावकारे यांच्या सूचनेने १-२ महिन्यात परवानगी घेऊन नवीन पंचधातूचा पुतळा बसवण्याचे आश्वासन मिळाले.
घटनेची माहिती अशी की कुऱ्हे (पानाचे) हे भुसावळ-जामनेर रस्त्यावरील मराठा बहुल गाव असून, लोकसंख्येनुसार तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बस स्थानकावर शिवरायांचा पुतळा बसविण्याची मागणी आणि चबुतऱ्याचे बांधकाम झाले असले तरी दुर्लक्ष होत होते. रविवारी रात्री शिवभक्तांनी अचानक पुतळा स्थापन केला, तर सोमवारी सकाळी मोठी गर्दी जमली.

प्रशासकीय कारवाई सकाळी ९ वाजता भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले, तालुका पोलीस स्टेशनचे पीआय महेश गायकवाडसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परवानगीशिवाय बसवलेला पुतळा हटवण्याची सुचना दिली . वस्त्रोद्योगमंत्री ना. संजय सावकारे यांनीही पोहोचून ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा परिषद माजी सदस्य समाधान पवारांसह ग्रामस्थांची बैठक घेतली. शेजारील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीजवळ नवीन चबुतरा बांधून रितसर परवानगी घेऊन पुतळा बसवण्याचे ठरले.
शिवभक्तांचा ठिय्या
महिलांसह शिवभक्तांनी पुतळ्याशेजारी बसून हटविण्यास मज्जाव केला. नवीन पुतळा बसविण्या पर्यंत छत्रपतींचा हा पुतळा जागेवर राहील, अशी मागणी करत ते ठाम राहिले. समितीने बैठकीत ठरलेल्या या सूचनेचा प्रतिसाद दिल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि हा पुतळा तात्पुरता कायम राहण्याची शक्यता आहे.

