Monday, March 2, 2026
Homeजळगावजे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि.२
आज सोमवार दि.२ गुरुवारी २०२६ रोजी व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन मॅडम इंग्लिश मीडियम च्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरूड मॅडम यांनी होळीचे पूजन करून होळी पेटवून केली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहाय्याने वाईट सवयी,वाईट गोष्टीचे दहन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षकां रुचिता पाटील मॅडम यांनी केले.मुलांना होळी विषयी पूनम कोळंबे मॅडम यांनी माहिती दिली नंतर मुलांनी छान प्रकारे नृत्य करून होळी साजरी केली.
अशाप्रकारे शाळेत होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या