सार्वजनिक शौचालयाचा फक्त एका बाजूचा पत्रा काढून मुख्याधिकाऱ्यांनी केला कारवाईचा देखावा..?
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीत नगरपालिका मालकीच्या सार्वजनिक शौचालयाची जागा हडप करण्याच्या उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शौचालयाचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार गेल्या काही दिवसांपासून लोखंडी पत्रे लावून पूर्णपणे बंद केल्याने या परिसरात संतापाची लाट पसरली होती हे शौचालय जामनेर रोडपासून अवघ्या १० मीटर अंतरावर रोहित्राजवळ आहे.स्थानिक नागरिकांच्या मते,काही भूमाफि

यांचा या जागेवर डोळा ठेवून असून त्याच उद्देशाने हे स्री-पुरुषांचे शौचालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.शौचालय बंद झाल्याने परिसरातील महिला,ज्येष्ठ नागरिक आणि मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सकाळी व संध्याकाळी शौचालयाची गरज असणाऱ्या नागरिकांना आता रस्त्यालगत किंवा उघड्यावर जावे लागत असल्याने आरोग्याचा व
नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान,या प्रकरणी भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फाटले यांचे प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की,सदरील प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येईल शौचालयाचे प्रवेशद्वार बंद केलेले पत्रे काढण्यात येतील.परंतु प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितले असता आज संध्याकाळी फक्त एका बाजूच्या प्रवेशद्वाराचे पत्रा जेसीपी मशीन ने काढला तर दुसऱ्या बाजूचा पत्र का काढला नाही.? याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एका बाजूचा पत्रा न काढल्याने जागा हडप करणाऱ्या व्यक्तीने भुसावळ नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यावर काही

सामाजिक,राजकीय दबाव,प्रभाव टाकला का.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी मुख्याधिकारी यांनी सदरील जागेवरील दुसऱ्या बाजूचा पत्रा सुद्धा तात्काळ काढावा नाहीतर पुढील कारवाईस भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी हे जबाबदार राहतील अशी त्या परिसरात चर्चा आहे.

