Friday, May 1, 2026
Homeजळगावशनिवार दि.२० डिसेंबरला एका जागेसाठी भाजप आणि शिवसेनेची लक्षवेधी टक्कर.

शनिवार दि.२० डिसेंबरला एका जागेसाठी भाजप आणि शिवसेनेची लक्षवेधी टक्कर.

शनिवार दि.२० डिसेंबरला एका जागेसाठी भाजप आणि शिवसेनेची लक्षवेधी टक्कर.

यावल        खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               दि.१२  यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ११ प्रभागातून २३ सदस्य निवडून येणार आहेत.तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग क्र.८ ब निवडणूक प्रक्रिया काही कारणास्तव थांबविण्यात आली होती यासाठी आता शनिवार दि. २० रोजी प्रभाग क्रमांक ८ ब मधील भाजपाचे उमेदवार बारी गोविंद मधुकर आणि शिवसेना ( उभाठा ) उमेदवार चौधरी सागर कुमार सुनील यांच्यात तुल्यबळ लढत होणार असल्याने याकडे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यातील राजकारणाचे समाजाचे लक्ष वेधून आहे.
नुकत्याच झालेल्या यावल नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभागात आणि अध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी साडेतीन हजार रुपये एका फुली मागे खर्च करण्यात आला.
लोकनियुक्त अध्यक्षपदाच्या महिला उमेदवार भारतीय जनता पार्टी तर्फे रोहिणी उमाकांत फेगडे तर शिवसेना उभाठा तर्फे छाया अतुल पाटील यांच्यात खरी तुल्यबळ लढत झाली असली तरी शिवसेनेच्या स्वाती मनोहर पाटील आणि अपक्ष लोकनियुक्त अध्यक्षपदासाठी असलेल्या महिला उमेदवार सुलेमानी शबानावी या दोन महिला अध्यक्षपदाची मते जी घेतील त्याचा फायदा शिवसेना उभाठा यांना होईल की भारतीय जनता पार्टीला होईल हे आपल्याला येत्या २१ डिसेंबरला समजणार आहे.
यावल नगरपरिषद निवडणुकीत प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीला आपल्या एका वरिष्ठ नेत्याला तथा एका मंत्र्याला आणि आमदाराला निवडणूक रिंगणात प्रचारासाठी उतरावे लागल्याने यावल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक इकडे यावल शहरातील नागरिकांचे तालुक्यातील नागरिकांचे संपूर्ण समाजाचे लक्ष लागून आहे.

ही निवडणूक भाजपाचे उमेदवार ॲड.गोविंद बारी,आणि उभाठाचे सागर चौधरी यांच्या सरळ होणार असली तरी भाजपाच्या उमेदवारासाठी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि पदाधिकारी तसेच उभाठाच्या उमेदवारा साठी भुसावळ शहरातील माजी आमदार संतोष भाऊ चौधरी आणि विधानसभा क्षेत्र गाजविणारे अनिल चौधरी हे खरे आधारस्तंभ, मार्गदर्शक असल्याने ही एका प्रभागाची निवडणूक यावल नगरपालिकेच्या इतिहासात फारच महत्त्वाची प्रतिष्ठेची आणि जबाबदारीची होणार असल्याचे संपूर्ण यावर शहरात बोलले जात असून उभाठा उमेदवाराची चिकाटी लोकप्रियता लक्षात घेता भाजपला या निवडणुकीत चांगलीच मेहनत करावी लागणार असल्याने निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाचा न.पा. सदस्य निवडून येईल याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या