Friday, May 1, 2026
Homeजळगावआपल्या गुरूंचे स्वप्न साकार केले जनार्दन हरीजी महाराजांनी - युग प्रवर्तक होते...

आपल्या गुरूंचे स्वप्न साकार केले जनार्दन हरीजी महाराजांनी – युग प्रवर्तक होते ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज

आपल्या गुरूंचे स्वप्न साकार केले जनार्दन हरीजी महाराजांनी –
युग प्रवर्तक होते ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
येथील सतपंथ मंदिर संस्थांचे 11 वे गादीपती ब्रह्मलीन पूज्य संत जगन्नाथ महाराज यांच्या 24 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय संत समितीचे संत महात्म्यांसह परिसरातील सर्व धर्म पंथाचे अनुयायी यांनी आदरांजली वाहताना ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी जे जे कार्य केले ते कार्य त्यांचे वारस गादीपती परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी पूर्ण करत त्यांचे स्वप्न साकार केले हीच ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज यांना श्रद्धांजली होय असे संतांनी सांगितले.

 


सतपंथ रत्न महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज व अखिल भारतीय सर्व पंथीय संतांच्या उपस्थितीत व पंचक्रोशीतील सतपंथ साधकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
शनिवारी मंदिरात भव्य पूजा करण्यात आली. रविवारी सकाळी ७ वाजता मंदिर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. फैजपूर गावातून ही शोभायात्रा समाधीस्थळी ९:३० वाजता पोहोचेली.
सर्व संतांनी प्रथम संत जगन्नाथ महाराजांच्या समाधीचे पूजन केले. त्यानंतर पुण्यतिथी समारोह प्रसंगी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सतपंथ देवस्थानच्या वतीने उपस्थित सर्व संतांचा सन्मान करण्यात आला.
प पू महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गुरु जगन्नाथ महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. आपल्या हातून होत असलेल्या कार्याचे स्वप्न हे ब्रह्मलीन गुरुवर्य जगन्नाथ महाराजांचे स्वप्न होत. ते आपल्या हातून पूर्ण होत असल्याचं समाधान आपल्याला आहे असे प्रतिपादन केले.
पुण्यतिथीचे औचित्य साधून सतपंथ मंदिर संस्थान संत परंपरेतील गुरुवर्य ब्रह्मलीन धर्मा‌ महाराजांपासून तर भावी महंत एकदंत महाराज यांच्या पर्यंत पाच पिढ्यांची सेवा करीत असलेल्या श्रीमती सुमनबाई प्रेमचंद सोनवणे यांचा परिवारासह सत्कार करण्यात आला. यावेळी सुमनबाई अतिशय भावूक झाल्या होत्या.

 

 

Oplus_131072

श्रद्धांजली अर्पण करताना प. पू.महामंडलेश्वर श्री राधे राधे बाबा यांनी गुरु जगन्नाथ महाराजांचे कार्य स्पष्ट करताना महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी हे गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर अतिशय चांगली वाटचाल करीत आहे. हीच गुरुप्रती खरी श्रद्धांजली ठरत असल्याचे सांगितले. प.पू. मानेकर बाबा, संत समितीचे कार्याध्यक्ष स्वामी अनिल आनंद जी महाराज, महंत हनुमानदासजी महाराज भोपाळ, महंत स्वरुपानंदजी माहाराज डोंगरदे, स्वामी लक्ष्मणदासजी महाराज -रावेर, महामंडलेश्वर अरुणदासजी महाराज हरिद्वार, महंत रामचंद्र दासजी महाराज, महंत जगदीश दास जी महाराज, ह भ प रवींद्र महाराज महाले नायगव्हाण, ह.भ.प. भरत महाराज, ह भ प धनराज महाराज, ह भ प दुर्गादास महाराज, प्रजापिता ब्रम्हा कुमारी शकुंतला दिदी, स्वयंप्रकाशदासजी महाराज सावदा, प. पू.श्यामचैतन्यजी महाराज जामनेर, प पू गेंदालालजी महाराज भुसावळ, श्रीकांत जी रत्नपारखी जळगाव, नरेंद्र भाऊ नारखेडे, आचार्य डॉ. सचीन पाटील यांनी शब्द पुष्पांजली अर्पण केली. यावेळी पंचक्रोशीतील समस्त भक्त मंडळी तसेच महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश येथील सतपंथमुखी परिवार यांचे सह हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या