श्री सद्गुरु झेंडूजी महाराज (बेळीकर) यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
लेवा पाटीदार समाज संस्था व श्री महालक्ष्मी ग्रुप, भुसावळ तर्फे दिनांक १६/१२/२०२५, मंगळवार, रोजी आद्य गुरु वारकरी संप्रदायाचे प्रणेते श्री सद्गुरू झेंडूजी महाराज (बेळीेकर) यांचा १४७ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
खान्देशात सर्व प्रथम वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ ज्यांनी रचली असे वै.ह.भ.प सद्गुरु झेंडूजी महाराज (बेळीकर) यांची मार्गशीर्ष वद्य द्वादशी दिनांक १६ /१२/२०२५ मंगळवार, रोजी १४७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यांनी आपल्या आयुष्यात तब्बल ४५ वर्ष वारकरी संप्रदाय च्या प्रचार प्रसाराचे पवित्र निष्काम कर्म केले. १४७ वर्षापूर्वी मार्गशीर्ष वद्य द्वादशी दिनांक २१/१२/१८७८ शनिवार रोजी श्रीक्षेत्र कोथळी येथे आदिशक्ती आईसाहेब मुक्ताई च्या चरणी सद्गुरूंनी देह ठेवला.
अशा या परमपूण्य सद्गुरूंची पुण्यतिथी साजरी करण्याचे हे ११ वे वर्ष असून आपण मोठ्या भक्ती भावाने व आनंदाने साजरे करत आहे. यावेळी समाज मंडळाचे सदस्य व श्री महालक्ष्मी ग्रुप सदस्य तसेच मान्यवर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी महाराजांचा जीवनक्रम व त्यांचे आध्यात्मिक कार्य विशद करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री प्रकाश पाटील, मधुकर लोखंडे, अभिषेक पाटील, नितीन लोखंडे, धर्मराज देवकर, धीरज पाटील सर, अरविंद कुरकुरे सर, बाबुराव भंगाळे, किशोर चौधरी, लीलाधर भारंबे, संजय बऱ्हाटे, चंद्रकांत पाटील, प्रशांत देवकर, हे मान्यवर उपस्थित होते.

