हिरालाल लोथे यांची इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती

फैजपूर : खानदेश लाईव्ह प्रतिनिधी
येथील मूळ रहिवासी तथा नाशिक येथील धुरंदर पत्रकार हिरालाल भाऊ लोठे यांची इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या राष्ट्रीय सचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
हिरालाल लोथे यांनी भारतीय मिडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चेअरमन ( जनरल कमिटी) या पदाचा कार्यभार सांभाळत असतांना संपूर्ण महाराष्ट्रात अतुलनीय कामगिरी करीत केवळ पत्रकार संघटना म्हणून राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील अनेक
पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पत्रकारांच्या सोबतीने त्यांनी पाठपुरावा करून अनेक विषयांची अंमलबजावणी करण्यास शासनास भाग पाडून तसेच अन्यायग्रस्तांना योग्य मार्गदर्शनातून संबंधितांकडून न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय समितीने घेतली. त्यांना राष्ट्रीय समितीमध्ये स्थान देऊन एक मोठे जबाबदारीचे पद दिले. त्यांची राष्ट्रीय सचिव इलेक्ट्रॉनिक मिडिया सेलच्या राष्ट्रीय सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त त्यांचे प्रशासकीय, राजकीय, सामाजिक अशा अनेक संस्थांच्या वतीने तसेच विविध क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ, समाजसुधारक यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव केला.

