भुसावळ ते श्रीक्षेत्र शेगाव पदयात्रा पालखी सोहळा २०२५ चे आयोजन
भुसावळ : खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत सेवा समूहाच्या वतीने भुसावळ ते श्रीक्षेत्र शेगाव अशी संत गजानन महाराजांची पदयात्रा पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ ते रविवार, २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार असून, भाविकांना संत गजानन महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळेल.
यात्रेचे प्रस्थान २५ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ६ वाजता भुसावळ येथील जय श्री दादाजी पेंट्स येथून होईल.
यात्रेचे दिननिहाय वेळापत्रक व मुक्काम :
1) २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार): भुसावळ ते मुक्ताईनगर
सकाळचा नाश्ता – हिरामती मंदिर, जळगाव येथे
दुपारचे भोजन – नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील नागराणी पेट्रोल पंपाजवळ (पारशी भाऊ मराठी यांच्या वतीने)
रात्रीचा मुक्काम – नवीन मुक्ताई संस्था नगर, मुक्ताईनगर
2) २६ डिसेंबर २०२५ (शुक्रवार): मुक्ताईनगर ते मलकापूर
सकाळचा नाश्ता – गुरुद्वारा घोडेगाव, हायवे क्रमांक ६
दुपारचे भोजन – विलास श्रीराम पाटील, तालस वाडा, मलकापूर
रात्रीचा मुक्काम – चांगदेव आयटीआय, मलकापूर (गोपाल भाऊ प्रजापती यांच्या वतीने)
3)२७ डिसेंबर २०२५ (शनिवार): मलकापूर ते नांदुरा
सकाळचा नाश्ता – सुरत देवराम सोनवणे, भुसावळ यांच्या वतीने
दुपारचे भोजन – वडनेर भोये (निंबाजी वेलोकर यांच्या वतीने)
रात्रीचा मुक्काम – रेस्ट हाऊस, नांदुरा
4)२८ डिसेंबर २०२५ (रविवार): नांदुरा ते खामगाव ते श्रीक्षेत्र शेगाव
सकाळचा नाश्ता – विधी जयस्वाल, भुसावळ यांच्या वतीने
दुपारचे भोजन – अण्णा कोटी, शेगाव रोड, खामगाव
संध्याकाळी श्रीक्षेत्र शेगाव येथे पोहोचून संत गजानन महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन व मुक्काम
या पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी त्वरित आपली नावनोंदणी करावी. नावनोंदणीसाठी श्री संत सेवा समूहाच्या कार्यालयात – श्री जयश्री दादाजी पेंट्स, नाटा चौफुली, जामनेर रोड, भुसावळ येथे संपर्क साधावा.
संस्थापक प्रकाश देवलाल जयस्वाल यांनी सर्व भाविकांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संपर्क क्रमांक : ८८८८५५०५६६
ही यात्रा भाविकांसाठी आध्यात्मिक अनुभवाची संधी असून, सर्वांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. जय गजानन!

