Friday, May 1, 2026
Homeजळगावपाल येथे पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा समारोप उत्साहात

पाल येथे पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा समारोप उत्साहात

पाल येथे पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा समारोप उत्साहात

रावेर खानदेश लावी न्यूज प्रतिनिधी                     पाल ता रावेर दि २९/१२/२०२५
पाल येथे चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव आणि दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था पाल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दिनांक २७ ते २८ दोन दिवस चाललेल्या या संमेलनात पक्षी अभ्यास, निसर्ग संवर्धन व जैवविविधता विषयक विविध संशोधनात्मक सत्रे व चर्चासत्रे झाली. समारोप सोहळ्याला संमेलनाध्यक्ष डॉ. विनोद भागवत, प्रमुख अतिथी एम. झेड सरवर (IOFS), पुनित अग्रवाल, वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंत शेवाळे, उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे पदाधिकारी, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, समन्वयक

 

विलास महाजन तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी पाल शीतल नगराळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. त्यांनी पक्षी संरक्षण, निसर्ग संवर्धन व जैवविविधता जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा संमेलनांमुळे पर्यावरणाविषयी जनजागृती होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्था चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव, वनविभाग नाशिक, उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था व स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले. सहभागी अभ्यासक व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या संमेलनात राज्यभरातून सुमारे १५० पक्षी अभ्यासक, संशोधक व निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत व पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात संमेलन आयोजित करण्याचा संकल्प करत संमेलनाचा समारोप झाला.
*छायाचित्र:-* पाल ता रावेर येथे पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी संमेलनाच्या समारोपप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या