Friday, May 1, 2026
Homeजळगावबिकट परिस्थितीवर मात करीत परवेज तडवी यांनी देश सेवेचे स्वप्न केले साकार

बिकट परिस्थितीवर मात करीत परवेज तडवी यांनी देश सेवेचे स्वप्न केले साकार

बिकट परिस्थितीवर मात करीत परवेज तडवी यांनी देश सेवेचे स्वप्न केले साकार

पाल रावेर खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी               पाल ता रावेर दि ७/१/२०२६ मनात जिद्द, चिकाटी एखादा उद्देश्य समोर ठेवून मेहनत केली तर कोणतेही कार्य सिद्ध होते. याचे उत्तम उदाहरण पाल येथील परवेज ईसामुद्दिन तडवी .
परवेज तडवी यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांचे वडील ईसामुद्दिन तडवी हे पिठाची गिरणी चालवतात व आई शेती काम करून घराचे उदरनिर्वाह करतात. अशा बिकट परिस्थित परवेज तडवी यांच्या आई वडील यांनी आपल्या दोन मुलांना शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारची काटकसर केली नाही त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यातील त्यांच्या मोठा मुलगा रियाज तडवी वन विभागात वनरक्षक पदावर आहे. व परवेज तडवी यांनी अहोरात्र परिश्रम करून आपल्या जिद्द चिकाटी व मेहनतीच्या आणि अभ्यासाच्या जोरावर सीमा सुरक्षा दलात ( बीएसएफ) पदावर भरती होऊन भारत देशाचे सेवेचे स्वप्न साकार केले. परवेज तडवी व त्यांच्या मोठा भाऊ रियाज तडवी दोघेही शालेय जीवनापासून कष्टाळू ,मेहनती,अभ्यासू होते. त्यांनी कठोर मेहनत व परिश्रम करून यश मिळवले.

 

 


सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) प्रशिक्षण पूर्ण करून परवेज तडवी प्रथम नियुक्ती वेस्ट बंगाल या ठिकाणी करण्यात आली आहे. परवेज तडवी यांची सीमा सुरक्षा दलात निवड झाल्याने पाल गावासाठी गौरवास्पद बाब आहे. त्यांच्या यशामुळे गावातील व परिसरातील येणाऱ्या नवीन पिडीसाठी प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या या यशामुळे मित्रमंडळीसह गावकरी व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी ग्रामस्थांनी त्यांना सुरक्षित यशस्वी आणि गौरव पूर्ण देश सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
*गावात जल्लोषात स्वागत*
सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परवेज तडवी यांचे जल्लोष स्वागत करण्यात आले. मित्रमंडळी व गांवकरी यांनी डीजे पथकासह घोड्यावर बसवूनत्यांची मिरवणूक काढली यावेळी देशभक्तीपर गीत, “भारत माता की जय”अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेले.
*छायाचित्र:-*पाल ता रावेर परवेज तडवी यांचे स्वागत करताना पाल येथील मित्र मंडळी व ग्रामस्थ.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या