Friday, May 1, 2026
Homeजळगावउदळी येथील मुख्य रस्त्याचे काम नियमा प्रमाणे करावे - सरपंच

उदळी येथील मुख्य रस्त्याचे काम नियमा प्रमाणे करावे – सरपंच

उदळी येथील मुख्य रस्त्याचे काम नियमा प्रमाणे करावे – सरपंच

सावदा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     सावदा   उदळी बुद्रुक व खुर्द दोन्ही गावचे गावठाण सीमा हद्दीला लागून चोरवड ते दुसखेडा प्र.जि.मा.क्र.१७ हा रस्ता सा . बां विभागाच्या अखत्यारीतील असून सदरचे रस्ताचे २२ फुट रुंदीचे काम सुरु असून या कामात उदळी बु या गावावर अन्याय होत असल्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागा कडे सरपंच व ग्रामस्थांनी दिले आहे .

निवेदनात म्हटले आहे की’ उधळी बु . व उधळी खु या दोन्ही गावची पाच जानेवारी रोजी विभागाळ स्वःता येऊन गावठाणातील रस्त्याला लागून असलेले प्लॉट धारकांची गावठाण लेआउट नकाशा नुसार मोजणी केलेली असुन ती मोजणी दोन्ही गावातील सरपंच व प्लॉट धारक यांना दिलेले रस्त्याचे मध्य पाईंट मान्य आहे . तरी सुध्दा हेकेखोर पणाने अधिकारी रस्त्याच्य सेंटर पासून सदरील रस्ता समांतर न बांधता पूर्ण २२ फुट रुंदीचा रस्ता उधळी बु|| गावठाण सीमा हद्दीला लागून काम सुरू आहे . उदळी खुर्द बाजुने रस्त्यात असलेले दुकानदार यांना पूर्ण सहकार्य करून काम नियमांचा विरुद्ध सुरूच आहे . रस्त्यामध्ये इले. पोल डीपी. मुतारी , दुकान धारकांचे अतिक्रमण वाचवण्यासाठी उधळी बु ग्रामस्थ यांच्यावर अन्याय होत आहे . नियम पाहता रस्त्याचे रुंदीकरण करणे किंवा अतिक्रमण काढणे

 

 

करीता रस्त्याचे सेंटर पाईंट धरून मापे टाकले जातात त्यावेळेस सदरील रस्ता उधळी बु।। सीमा हद्दीला लागून बांधलेला असल्याने वडीलोपार्जीत प्लॉट धारकांवर मोठा अन्याय होत आहे . त्यामुळे आपणास प्लॉट धारक सरपंच गावकरी वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरुपात सांगून सुध्दा विभागाचे अधिकारी दबावा खाली घेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या बाबत ग्रामस्थ व सरपंच यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली जात आहे. तरी उधळी बु येथील प्लॉट धारक व गावकरी यांचे वरती दबाव न आणता व उधळी बु गावावर अन्याय न करता दोन्ही गावच्या सीमा हद्दीला लागून आपण मोजणी करून काढलेले सेंटर पाईंट नुसार रस्ता समांतर करण्यात यावा . ग्रामस्थांना वर अधिकारी दहशत निर्माण करित असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच पवित्र्यात आहेत .
प्रसिद्धी पत्रकावर सरपंच रंजना शांताराम पाटील व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या