Wednesday, August 26, 2026
Homeजळगावकरणी सेना प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन व गरजूंसाठी...

करणी सेना प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन व गरजूंसाठी अन्नदानाचा उपक्रम

करणी सेना प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन व गरजूंसाठी अन्नदानाचा उपक्रम

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  – श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना ही संघटना देशकल्याण व लोकहितासाठी सातत्याने कार्यरत असून तिचे कार्य व कर्तृत्व समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने संघटनेच्या वतीने दिनदर्शिका (कॅलेंडर) प्रकाशनाचा उपक्रम राबविण्यात आला.श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष, राजपूत समाजभूषण व कणखर नेतृत्व आदरणीय श्री दामोदर भाऊ राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनदर्शिकेचे प्रकाशन व उद्घाटन प.पू. आचार्य महामंडलेश्वर सतपंथरत्न अध्यक्ष व गादीपती, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर येथील श्री श्री जनार्दनजी हरी महाराज, तसेच कर्तृत्वसम्राट, राजपूत समाजभूषण, अखंड समाजाचे मार्गदर्शक, पाचोरा–भडगाव तालुक्याचे आमदार आदरणीय श्री किशोर (आप्पासाहेब) पाटील, पाचोरा नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई पाटील आणि भुसावळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. गायत्री ताई भंगाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.याच अनुषंगाने जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला टीमच्या वतीने गरजू रुग्णांसाठी अन्नदान कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाला करणी सेनेचे विविध पदाधिकारी व समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यामध्ये महेंद्रजी पाटील, संदीपजी राणा, सौ. सारिका ताई पाटील (महिला जिल्हाध्यक्ष), मीनाताई राजपूत, प्रथम सूर्यवंशी, ज्येष्ठ समाजसेवक आनंदा पाटील, रतन परदेशी, मनिष परदेशी, संजय पाटील, शैलेश ठाकरे, पुरुषोत्तम पाटील, जितेंद्र पाटील, राकेश तळेले, बी.एन. पाटील, भैयाभाऊ महाजन, प्रवीण पाटील, जगताप सर, गणेश राजपूत, राजू राजपूत तसेच महिला पदाधिकारी व समाजभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी आमदार श्री किशोरजी आप्पासाहेब पाटील यांनी आदरणीय दामोदर भाऊ राजपूत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. उपस्थित समाजबांधवांनी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाची प्रगती व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.याप्रसंगी आदरणीय दामोदर भाऊ राजपूत यांनी राजपूत समाजातील सर्व घटकांसाठी निष्ठेने कार्य करण्याचे आश्वासन दिले.या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कपिलेश्वर ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या