Friday, May 1, 2026
Homeजळगावपाल जंगल सफारी ठरतेय पर्यटकांचे आकर्षण केंद्र

पाल जंगल सफारी ठरतेय पर्यटकांचे आकर्षण केंद्र

रावेर पाल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – पाल जंगल सफारी पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी म्हणून ओळखली जाणारी ही सफारी रावेर तालुक्यातील पाल येथे सुरू करण्यात आली आहे. या सफारीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व जळगाव जिल्ह्याचे

Oplus_131072

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते २ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते. या जंगल सफारीचे प्रमुख उद्देश म्हणजे परिसरातील वन्यप्राणी, पक्षी ,वनसंवर्धन तसेच जंगल सफारी मुळे आदिवासी भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे. या जंगल सफारीला वाढता प्रतिसाद तसेच वन्य प्राण्यांची दर्शन सुंदर व आकर्षक जंगल यामुळे ही जंगल सफारी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या जंगल सफारीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून यामुळे निसर्ग संवर्धनाला चालना मिळणार आहे. जंगल सफारी मध्ये पर्यटकांना या वन्य प्राण्यांचे घडतात दर्शन पाल जंगल सफारी मध्ये वाघ, बिबटे, हरणे,चौसिंगा,कोल्हा, लांडगा , रानडुक्कर,ससा,निलगाय, सांबार तसेच पक्षांमध्ये मोर, लांडोर ,चिमणी ,सुतारपक्षी, बुलबुल, घुबड, कोकिळा, बगळा, मैना, कबूतर, हंस, जंगल सफारी मध्ये विविध प्रकारचे पक्षी आढळतात जे या जंगलाच्या जैवविविधतेचे प्रतीक आहे.

Oplus_131072

पाल जंगल सफारी मध्ये पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक स्थळे आहेत त्यापैकी ही प्रमुख स्थळे:

लेक व्ह्यू पॉइंट:- या ठिकाणाहून डोंगराच्या उंचावरून तलावाचे मोहदृश्य पाहता येते जे निसर्गाच्या सानिध्यात पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाण आहे.

इको हॉट पॉईंट :- निसर्गाच्या जवळ राहून पर्यावरणाच्या अनुभव घेण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे.

वाघडोह:  जंगल सफारीतील सर्वात रोमांचक भाग म्हणजे वाघडोह येथे वाघ बिबट्या यांच्यासह विविध वन्य जीवांच्या अधिवास आहे.

सनसेट पॉइंट  सूर्यास्ताच्या सुंदर दृश्य पाहण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे. अशा अनेक ठिकाणी पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवता येतो.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या