संत मुक्ताई पत्रकार संघटनेतर्फे राम रोटी आश्रमात एकादशी निमित्त फराळ वाटप!
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथे गेल्या 18 वर्षापासून संत- महापुरुषांच्या विचार कार्यांवर चालू असलेली मानव सेवा हिच ईश्वर सेवा हि सेवाभावी वृत्ती जोपासलेली प.पु. गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रमात एकादशी वारीला संत मुक्ताई पत्रकार संघटने कडून भाविक, वारकर्यांना साबुदाणा फराळ वाटप करण्यात आले.
सकाळी दहा वाजेपासून जुन्या मुक्ताईमंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली. सुरुवातीला प. पु. रामभाऊ बाबा पुजारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून फराळ वाटपास सुरवात झाली.दिवसभर शेकडो भाविकांनी साबुदाणा खिचडी फराळाचा लाभ घेतला. याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब गावंडे, सचिव रामभाऊ टोंगे, रघुनाथ पाटील, किरण महाजन, माजी सरपंच माळी, जेष्ठ पत्रकार मोतीलाल जोगी, मोहन मेढे,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अमोल वैद्य,सचिव राजेश पाटील, विनायक वाडेकर, शरद बोदडे, निलेश मेढे, राजेश चौधरी,सचिन झनके, प्रवीण भोई, संदीप जोगी, विठ्ठल धनगर, रवी पवार आदि पत्रकार बांधव, भाविक उपस्थित होते.

