Friday, May 1, 2026
Homeजळगावजगाला संस्कार देणारा भारत घडवण्याचा संकल्प करूया - प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे

जगाला संस्कार देणारा भारत घडवण्याचा संकल्प करूया – प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे

जगाला संस्कार देणारा भारत घडवण्याचा संकल्प करूया – प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फैजपूर येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे यांनी मार्गदर्शन केले. ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा’ या भावनेचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत असून भारताने फक्त आर्थिक महासत्ता होण्याचा प्रयत्न न करता आर्थिक महासत्ता होण्यासोबत ‘सांस्कृतिक गुरु’ म्हणून भारताला विकसित करण्यात सक्रिय सहभाग देण्याचा महत्तम संकल्प सर्व भारतवासियांनी या प्रजासत्ताक दिनानिमित्त करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केले.

ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. वाय. चौधरी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य आर. एल. चौधरी, माजी प्राचार्य डॉ. व्हि. आर. पाटील यांच्यासहित उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार तंबाखू मुक्तीची शपथ देऊन स्वतःला तंबाखूजन्य पदार्थापासून दूर ठेवून, परिवार, संस्था व समाजाला कीड लावणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांना स्वतःही सेवन न करता इतरांनाही यापासून परावृत्त करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भाषणे, गाणी व शेरोशायरींच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या