Thursday, November 21, 2024
Homeजळगाव१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त किनगाव बु. ग्रा.पं.तर्फे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या...

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त किनगाव बु. ग्रा.पं.तर्फे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण.

ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी –
किनगाव बु.ग्रामपंचायतने आपल्या सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपल्या ग्रामपंचायत तर्फे ध्वजारोहण नवनिर्वाचित सरपंच ताई सौ.भारती प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्या प्रयत्नातून १५ वा वित्त आयोगातून आपल्या किनगाव बु. गावातील घन कचरा व्यवस्थापना साठी संकलनासाठी घंटागाडी खरेदी करण्यात आली त्या घंटा गाडीचे लोकार्पण आपल्या यावल तालुक्याचे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी गावातील जेष्ठ,श्रेष्ठ पदाधिकारी ग्रामस्थ, यांच्यासह सरपंच,उपसरपंच सर्व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

किनगाव खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायत कामकाजात माजी आमदार रमेशदादा यांच्या कालावधीत काही माजी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व काही माजी सदस्यांनी ग्रामपंचायत तर्फे अनेक विकास कामे केली,परंतु फक्त एका माजी सरपंचांने आपल्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता आपल्या सोयीनुसार गुणवत्ता खड्ड्यात घालून कामे करून घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, ध्वजारोहण कार्यक्रमासाठी किनगाव बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतचे काही माजी सदस्य उपस्थित न राहिल्याने त्यांच्यामध्ये देशभक्ती आणि आपुलकीचे कर्तव्य राहिलेले नाही का..? याबाबत ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून उपस्थित न राहणाऱ्या सदस्यांना इतर महत्त्वाची वैयक्तिक कामे महत्त्वाची होती का..? त्यामुळे आले नसतील असे सुद्धा बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या