भुसावळ शहर शिवजयंती उत्सव समिती २०२६ गठित करण्यासाठी आज समिती साठी ओपन बैठक
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तारखेप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ नव्याने गठित करण्यासाठी आज गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे खुल्या निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षा प्रमाणे शिवजयंतीचा भव्य व ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी ही समिती गठित करण्यात येणार असून, या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेत भुसावळ शहरातील सर्व समाजातील मान्यवर, शिवप्रेमी, कार्यकर्ते व समाजसेवी यांची प्रमुख उपस्थिती अपेक्षित असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, दीपक धांडे, नितीन धांडे, राजेंद्र आवटे, निर्मल कोठारी, सचिन चौधरी, चेतन भंगाळे, बाळा सोनवणे, बाळा मोरे, प्रशांत नरवाडे , विजय चौधरी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकतेच्या भावनेतून, शिस्तबद्ध व ऐतिहासिक स्वरूपात साजरी करण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी या खुल्या निवड बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे राज पाटील, रितेश नायके, पवन मेहरा, सोनी ठाकूर ,लव झाडगे यांनी आवाहन केले आहे.

