वाघोदा ते निंभोरा रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे चौकशी न झाल्यास आंदोलन उभारणार..?
रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१२
तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक ते निंभोरा (४ किमी ) या रस्त्याचे नुकतेच जे डांबरीकरण करण्यात आले ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे ग्रामस्थ नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याने वरिष्ठ स्तरावरून या कामाची चौकशी करून कार्यवाही न झाल्यास फार मोठे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा काही पदाधिकारी नागरिकांनी दिला आहे.
काही वर्षांपूर्वी या मार्गावरील मोठा वाघोदा बुद्रुक गावातील सुमारे १ कि.मी. रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला होता.मात्र त्यानंतर अल्पावधीतच रस्त्याच्या मध्यभागी एक ते दीड फूट खोल भेगा व मोठे खड्डे पडले होते.कोरड्या हंगामात धुळीचा त्रास आणि पावसाळ्यात पाण्याने भरलेले खड्डे – “रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता?” असा प्रश्न वाहनधारकांना पडत होता. वारंवार तक्रारी व वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस कारवाई झाली नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. फक्त ‘मलमपट्टी’ की कायमस्वरूपी उपाय? गेल्या पाच दिवसांत मोठा वाघोदा बुद्रुक ते निंभोरा या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले.मात्र नागरिकांच्या मते,जाड खडी न टाकता,सपाटीकरण न करता,रोडरोलरने योग्य दाब न देता फक्त एक ते दीड इंचाचा डांबराचा पातळ थर (कारपेट) टाकण्यात आला.विशेष म्हणजे, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर थेट डांबरीकरण करून जणू “मुठमाती” देण्यात आल्याचा आरोप होत आहे. याच पद्धतीने मोठा वाघोदा बुद्रुक ते चिनावल मार्गावरही डांबरीकरण झाल्याचे सांगितले जात आहे.तसेच चिनावल फाटा ते उर्दू शाळा या सिमेंट काँक्रीट रस्त्यावरही डांबराची पातळ चादर टाकण्यात आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

अधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेत
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण ४ किमी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सावदा सार्वजनिक बांधकाम विभागातील एकही अधिकारी,कर्मचारी किंवा सुपरवायझर यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली किंवा नाही असा प्रश्न उपस्थित होऊन कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.संबंधित ठेकेदाराने महागड्या चारचाकीतून रस्त्यावर फेरफटका मारल्याची चर्चा असून, कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता,कनिष्ठ अभियंता व सुपरवायझर यांना हा प्रकार दिसून आला नाही का ? की सर्वांचे संगनमताने रस्त्याचे बांधकाम झाले.? असा प्रश्न नागरिकांमध्ये वाहनधारकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थळ पाहणी करावी रस्त्याचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक
असल्यास खोदकाम करावे
योग्य प्रमाणात जाड खडी टाकून रोडरोलरने दाबाई करावी
मानकांनुसार दर्जेदार डांबरीकरण पुन्हा करावे अन्यथा एक जिल्हा पदाधिकारी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार असल्याची चर्चा व आमदार मध्ये नागरिकांमध्ये आहे.

