Saturday, February 21, 2026
Homeजळगावपवित्र रमजान महिन्यात मूलभूत सुविधा द्याव्यात : निवेदनाद्वारे मागणी

पवित्र रमजान महिन्यात मूलभूत सुविधा द्याव्यात : निवेदनाद्वारे मागणी

पवित्र रमजान महिन्यात मूलभूत सुविधा द्याव्यात : निवेदनाद्वारे मागणी

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

पवित्र रमजान महिन्याचे उपवास (रोजे)
सुरू होत असताना शहरातील मुस्लिम
बहुल भागांमध्ये मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी एम. मुसा जनविकास मल्टीपर्पज सोसायटी तथा कोहेनूर गवंडी कामगार संघटना व प्रभाग १ च्या नागरिकांच्या वतीने फैजपुर नगरपालिका
कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
रमजान महिन्यात पहाटे सहेरी व सायंकाळी इफ्तारच्या वेळी पाणीपुरवठा, वीजपुरवठा व स्वच्छता याबाबी अत्यंत महत्त्वाच्या
ठरतात. त्यामुळे शहरातील तडवी
वाडा, नजीर बलदार चौक, आशियाना
पार्क, ताहानगर (कळमोदा रोड), इकरा
नगर, खलील मस्जिद परिसर, उमर मस्जिद परिसर, मिल्लत नगर (बहिणाबाई शाळेमागील भाग), इस्लामपुरा झोपडपट्टी (ईदगाह रोड), हजीरा मोहल्ला, मदारवाडा, पठाणवाडी, आदी भागांमध्ये तातडीने सुविधा पुरविण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कुरेशी मोहल्ला या वस्त्यांमध्ये मुस्लिम समाजाची मोठी वस्ती असून सध्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा अनियमित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्या आहेत. तसेच रस्त्यावरील दिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या असून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्काळ गटार साफसफाई, कीटकनाशक फवारणी व नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

Oplus_131072

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रमजान हा पवित्र व संयमाचा महिना असून नागरिकांना कोणत्याही अडचणी शिवाय धार्मिक कर्तव्य पार पाडता यावे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून संबंधित विभागांना आदेश द्यावेत व आवश्यक त्या उपाययोजना
कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात
आली. त्वरित निवेदन स्वीकृत करताना
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित
विभागांकडून तातडीने पाहणी करून
आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या