‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी
प्रतिमाह मानधन सुरु करा !
एकल-अविवाहित विकास मंचची मागणी
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
हल्लीच्या धावत्या युगात अनेक लोक असे आहेत की, कोणाच्या आधाराविना विविध
कारणांमुळे सिंगल म्हणजे ‘एकल’ जीवन जगत आहेत. त्यात अनेक स्त्री-पुरुष, युवक-
युवतींचा समावेश आहे. त्यांच्या भविष्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनात त्यांचा शिक्षणाचा प्रश्न, आरोग्य, स्वतःचे हक्काचे घर, रोजगार, सुरक्षितता, आपुलकीचा वर्ग, दरमहा शासनाकडून वेतन मिळावे अशी मागणी एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद
पाटील यांनी केली आहे. एकल जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी विविध कार्पोरेट
कंपनी, विविध समाजसेवी संस्था, सोशल वर्कर्स, देणगीदार, अभ्यासक आदी लोकांनी सहकार्य करणे काळाची गरज असून

शासनाने त्यांच्या उदरनिर्वाहासह विकासासाठी विविध योजना राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यात अंध-अपंग निराधारांना मानधन कार्यरत आहे,
सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आहे, मोठ्या उद्योग व्यावसायिकांना विविध शासकीय सवलती अनुदान उपलब्ध आहे. त्याप्रमाणे एकल-अविवाहित व्यक्तींचे जीवनमान
उंचावण्यासाठी शासनाने तसेच स्वारस्य असणाऱ्या व्यक्ती, संस्था, अभ्यासक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन एकल-अविवाहित विकास मंचच्यावतीने करण्यात आले आहे.
“एकल व्यक्तींसाठी ठिकठिकाणी विविध सेवा प्रकल्पांची गरज आहे. अशा व्यक्तींनी दाद मागावी तर कुणाकडे? असा यक्ष प्रश्न सद्यस्थितीला उभा ठाकला आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरातून मार्गदर्शन सहकार्य अपेक्षित असल्याचे एकल-अविवाहित विकास मंचने म्हटले आहे.”

